दिल्ली उपराज्यपालांच्या आदेशानंतर, दिल्लीपोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशींविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना दिल्लीबाहेरील जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सांगितले.
(हेही वाचा – Sambhal मध्ये पुन्हा उत्खननावेळी सापडली ‘पायरी विहीर’)
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) नुकतीच दिल्ली बाह्य जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 175 संशयितांची ओळख पटली असून. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासात कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळून आली. तपासानंतर जे काही तथ्य समोर येतील. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यापूर्वीही पोलिसांनी शाहदरा आणि दक्षिण पूर्व जिल्ह्यात शोधमोहीम राबवली होती. त्यातही काही संशयित बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली होती. तसेच, आता दिल्लीकरांनी परिसरात कुणीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दिल्लीमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा अनेक दशकांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. दिल्ली एलजींनी पोलिसांना रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (Bangladeshi infiltrators)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community