व्हेप पेन, हुक्कामध्ये वापरले जाणारे ‘हशिश ऑईल’ (Hashish Oil) सह तामिळनाडूच्या दोन उच्चशिक्षित तरुणांना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वांद्रे येथून अटक केली आहे. या दोघांकडे पोलिसांना २ किलो ‘हशिश ऑईल’ (Hashish Oil) मिळुन आले असून या ऑइलची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकात दिली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटकडून ही कारवाई करण्यात आली असून या दोघांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hashish Oil Seized)
आनंद कुमार आणि उदय कुमार देवेंद्रन असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघे उच्च शिक्षित आहे. आनंद कुमार याचे शिक्षण बीएससी आयटी पर्यंत झालेले असून उदय कुमार हा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर असून तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी काम करतो, दोघेही तामिळनाडू मदुराई येथील रहिवासी आहे. वांद्रे पश्चिम येथे दोन तरुण अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटला मिळाली होती. (Hashish Oil Seized)
या माहितीच्या आधारे आझाद मैदान युनिटने सापळा रचून या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता एकाकडे दोन किलो वजनाचे ‘हशिश ऑईल’ (Hashish Oil) आढळून आले. अमली पदार्थ विरोधी पथकाने हे ऑईल जप्त करून दोघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या ‘हशिश ऑईल’ (Hashish Oil) ची किंमत २ कोटी रुपये असून या ऑईलचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांनी हे ऑईल कुठून मिळवले व ते कोणाला देणार होते याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Hashish Oil Seized)
(हेही वाचा – Air Pollution : धुळीचे प्रदुषण नियंत्रणासाठीच्या भाडेतत्वावरील मशिन्सवर भर, दोन यंत्रे महापालिकेच्या ताफ्यात)
हशिश ऑईलचा वापर
हशिश ऑईल (Hashish Oil) हा अमली पदार्थ गांजा या वनस्पतींच्या भागांपासून किंवा भांग, चरसच्या अर्कातून तयार केला जातो. हशिश ऑईल (Hashish Oil) हे द्रव, स्थायू स्वरूपात मिळत असून, त्याचा रंग सामान्यतः पारदर्शक सोनेरी किंवा हलका तपकिरी रंग किंवा टॅन किंवा काळसर असून, त्याचा वापर सेवनासाठी, धुम्रपानासाठी केला जातो. धुम्रपानासाठी हशिश ऑईल डबिंग उपकरण, विशेष प्रकारचा वॉटर पाईप्स, व्हेपोरायझर्स आणि व्हेप पेन मधून केला जातो. (Hashish Oil Seized)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community