Jammu and Kashmir मधील पुंछमध्ये 2 दहशतवादी ठार ; LoC जवळ घुसखोरीचा प्रयत्न; शोध मोहीम सुरू

37
Jammu and Kashmir मधील पुंछमध्ये 2 दहशतवादी ठार ; LoC जवळ घुसखोरीचा प्रयत्न; शोध मोहीम सुरू
Jammu and Kashmir मधील पुंछमध्ये 2 दहशतवादी ठार ; LoC जवळ घुसखोरीचा प्रयत्न; शोध मोहीम सुरू

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेजवळ पुंछमध्ये (Poonch) 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. सुरक्षा दलांचे यंदाचे हे पहिले यश आहे. जम्मूच्या सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले की, ‘ही घटना गुरूवारी (30 जाने.) संध्याकाळी घडली. पुंछ जिल्ह्यातील खारी करमारा भागात नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. सुरक्षा दलाच्या कारवाईत दोघेही ठार झाले, तर तिसरा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेला. सीमेवर अजूनही शोधमोहीम सुरू आहे.’ (Jammu and Kashmir)

हेही वाचा-Arvind Kejriwal यांनी यमुनेतील विषाचा पुरावा द्यावा; निवडणूक आयोगाकडून टीकेची गंभीर दखल

जम्मू भागात, पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) यांचे स्थानिक नेटवर्क, जे 20 वर्षांपूर्वी लष्कराने कठोरपणे निष्क्रिय केले होते, ते पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहे. पूर्वी हे लोक दहशतवाद्यांचा माल घेऊन जायचे, आता ते त्यांना गावोगावी शस्त्रे, दारूगोळा आणि अन्न पुरवत आहेत. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-SSC – HSC Exam : गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार

डिसेंबरमध्ये 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. जम्मू, राजौरी, पूंछ, रियासी, उधमपूर, कठुआ, डोडा, किश्तवार, जम्मू आणि रामबन या 10 पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेटवर्क तयार करण्यात आल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले होते. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-दिल्ली निवडणुकीआधी ‘आप’ला धक्का; चंदीगडच्या महापौरपदी भाजपाच्या Harpreet Kaur Babla विराजमान

जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद्य यांच्या म्हणण्यानुसार, कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने जम्मूला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. 2 वर्षात त्यांनी हे नेटवर्क सक्रिय केले. त्यांच्या मदतीने दहशतवाद्यांनी 2020 मध्ये पुंछ आणि राजौरी येथे लष्करावर मोठे हल्ले केले. त्यानंतर उधमपूर, रियासी, डोडा आणि कठुआ यांना लक्ष्य करण्यात आले. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.