‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया’ (ISIS) या संघटनेत सामील होण्यासाठी २०१४ मध्ये सिरीयात गेलेल्या कल्याणच्या तरुणासह २० संशयितांची सोमवारी एनआयएच्या (NIA) मुंबई विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. एनआयएकडून (NIA) चौकशी करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण आणि बंगळुरू येथील तरुणांचा समावेश आहे. (NIA)
‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया’ (ISIS) या संघटनेचे देशातील पाळेमुळे खोदून काढण्याचे काम तपास यंत्रणांकडून देशभरात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एनआयए (NIA) आणि राज्य एटीएसने (State ATS) इसिसचे पुणे मॉड्युल (ISIS Pune Module) उध्वस्त करून मुंबई, पुणे, ठाणे परिसरासातून अनेकांना अटक करून महाराष्ट्रातील महानगरातील घातपाताचा कट उधळून लावला आहे. तपास यंत्रणेच्या या कारवाईनंतर इसिसचे (ISIS) महाराष्ट्रातील नेटवर्क आणि इसिसचा महाराष्ट्रातील प्रमुख आणि सदस्यांची माहिती समोर आल्यानंतर गेल्या आठवड्यात एनआयए (NIA) आणि एटीएसच्या (ATS) पथकांनी पडघा-बोरिवली येथे छापेमारी करून मुख्य संशयित साकीब नाचनसह १५ जणांना अटक केली. (NIA)
(हेही वाचा – Vijay Hazare ODI Trophy : विजय हजारे चषकाच्या उपान्त्य फेरीत तामिळनाडू विरुद्ध हरयाणा तर कर्नाटक विरुद्ध राजस्थान)
कल्याणच्या ‘या’ तरुणाची देखील केली चौकशी
या कारवाईनंतर एनआयए (NIA) कडून मुंबई, ठाणे आणि कल्याण येथील २० संशयित तरुणांना चौकशीसाठी एनआयएच्या (NIA) मुंबई कार्यालयात सोमवारी बोलवले होते. या संशयितांमध्ये २०१४ साली इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया’ (ISIS) या संघटनेत सामील होण्यासाठी सिरीयात गेलेला कल्याणचा अरीब मजीद याची देखील चौकशी करण्यात आली आहे. अरिब मजिद याला अटक करण्यात आली होती. मजिद सध्या जामिनावर बाहेर आला आहे. एनआयए (NIA) चे या सर्वांच्या हालचालीवर लक्ष आहे. (NIA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community