Fake Currency : अनुपम खेर यांचा फोटो छापलेल्या बनावट नोटा देऊन खरेदी केले २१०० ग्रॅम सोने

या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी RESOLL BANK OF INDIA असे लिहिले होते.

260
गुजरातमधील अहमदाबाद येथील सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये फसवणूक करणारे 1 कोटी 90 लाख रुपये किमतीचे 2100 ग्रॅम सोने घेऊन फरार झाले आहेत. या फसवणूक करणाऱ्यांनी बनावट नोटांचा (Fake Currency) वापर करून दागिन्यांची फसवणूक केली आहे. ज्या नोटा ठेवून सराफाकडून सोने खरेदी केले त्या नोटांवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला होता.
हे प्रकरण अहमदाबादच्या सीजी रोडवरील बनावट अंगडिया फर्मशी संबंधित आहे. आरोपींनी ज्वेलर्सकडून प्रत्येकी 500 रुपये किमतीच्या 26 बंडलमध्ये सोने मिळवले. लक्ष्मी ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्रशांत पटेल यांनी सराफा व्यापारी मेहुल ठक्कर यांना सोने देण्यास सांगितले, त्यानंतर ठक्कर याने त्यांचा कर्मचारी भरत जोशी याला २१०० ग्रॅम सोने अंगडिया फर्मला देण्यासाठी पाठवले. भरत जोशी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की एकजण मोजणी यंत्रावर काम करत होता, तर दुसरा सोने घेऊन गेला. तिसऱ्या व्यक्तीने जोशी यांना बॅगेत 1.30 कोटी रुपये असल्याचे सांगून पुढील कार्यालयातून 30 लाख रुपये आणण्यास सांगितले. दरम्यान, भरत जोशी यांना नजरेआड करून तीन गुंड सोने घेऊन फरार झाले.
भरतने बॅगेतून ५०० रुपयांचे बंडल काढले तेव्हा त्याला समजले की, सर्व नोटा बनावट (Fake Currency) होत्या, त्यावर अनुपम खेर यांचा फोटो होता. याव्यतिरिक्त, या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी RESOLL BANK OF INDIA असे लिहिले होते. पोलीस आता आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि पकडण्यासाठी तपास करत आहेत, तर गुन्हे शाखा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.