सायबर गुन्हेगारांकडून मुंबईकरांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र वेळीच या फसवणुकीची तक्रार ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईन केल्यास खात्यातून दुसऱ्या खात्यावर वळती होणारी रक्कम थांबवता येते. मुंबई पोलिसांच्या सायबर हेल्पलाईमुळे एका तक्रारदाराची झालेल्या साडेचार कोटींच्या फसवणुकीपैकी ३ कोटी ७० लाख रुपये वाचवले. तक्रारदार यांनी ज्या खात्यांवर रक्कम वळती केली होती, सायबर हेल्पलाईन ने ते सर्व खाते गोठवून फसवणूक झालेल्या रकमेपैकी ३कोटी ७०लाख रुपये वाचवले आहे. सायबर हेल्पलाईनने विविध बँक खाते गोठवून २०२३ या वर्षभरात २६ कोटी ४८ लाख २२ हजार रुपयांची रक्कम वाचवली. (Cyber Fraud)
समाज माध्यमातून मुंबईतील एका व्यवसायिकाच्या संपर्कात आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदार व्यवसायिकाची शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चार कोटी छप्पन्न लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौपन्न रूपयांची फसवणूक केली होती. व्यवसायिकाने विविध बँक खात्यावर पैसे वळते केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यवसायिकाने तात्काळ सायबर हेल्पलाईन ‘१९३०’ वर कॉल करून फसवणुकीची माहिती दिली. (Cyber Fraud)
(हेही वाचा – Mumbai Police दलात कथित आरोपांच्या लेटरबॉम्बने उडवली खळबळ)
सायबर हेल्पलाईनच्या १९३० सायबर हेल्पलाईन मधील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ एन. सी. सी. आर पोर्टलवर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून नमुद सायबर फसवणुकीतील रक्कमेपैकी तीन कोटी, सत्तर लाख, त्रेचाळीस हजार पाचशे पंधरा रूपये विविध बँक खात्यात गोठविण्यात आले. सायबर हेल्पलाईनने विविध बँक खाते गोठवून २०२३ या वर्षभरात २६ कोटी ४८ लाख २२ हजार रुपयांची रक्कम वाचवली. (Cyber Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community