नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून मुंबईत कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या २७ म्हशींची मुंबईच्या वेशीवर सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुटका करण्यात आलेल्या म्हशींची रवानगी मनपा कोंडवाड्यात करण्यात आली आहे. (Crime)
बकरी ईद सणानिमित्त मुंबई शहरात इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश जातीच्या तसेच म्हशी इत्यादी जनावरे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी चोरट्या मार्गाने दाखल होत आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईच्या वेशीवरील मुलुंड पूर्व येथील आनंद नगर, टोल नाका येथे करुणा परिवार प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी आणि नवघर पोलिसांनी संशयितरित्या मुंबईकडे येणारा आयशर कंपनीचा टेम्पो पकडण्यात आला. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात दाटीवाटीने कोंबलेल्या २७ म्हशी आढळून आल्या. अधिक चौकशीत या म्हशी बकरी ईदसाठी मुंबईत कत्तलीसाठी मालेगाव येथून मागविण्यात आलेल्या होत्या. (Crime)
(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवली ते ठीक, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक; वक्फ बोर्डाच्या निधीवरून MNS ची टोलेबाजी)
टाटा आयशर टेम्पो चालक मोहम्मद कैस मोहम्मद जुबैर याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने म्हसवर्गीय जनावरे मालेगाव येथे राहणारा मुख्तारने मुंबईला पोचविण्यासाठी सांगितले अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडे जनावरे पाळण्याचा, किंवा वाहतुक करण्याचा किंवा कत्तल करण्याच्या परवानगीबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. नवघर पोलिसांनी बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात आलेला टेम्पो सह २७ म्हशी ताब्यात घेऊन म्हशींची रवानगी मनपा कोंडवाडा येथे करण्यात आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी टेम्पो चालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community