पुण्यात आयटी क्षेत्रातील लोकांची ३०० कोटीला फसवणूक

पुण्यात आयटी क्षेत्रातील तब्बल २०० जणांची ३०० कोटीला फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडारने लॉकडाऊन काळात कर्ज थकबाकीदार अशा आयटी क्षेत्रातील लोकांची माहिती मिळवत तुमचे कर्ज मी घेतो असे सांगत त्यांच्या नावावर एकाच वेळी तीन – तीन बँकांमधील कर्ज काढले. हे पैसे त्याने त्याच्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात ठेवण्यास सांगितले. अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. मात्र जेव्हा गुंतवणूकदार पैसे घेण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यालयाला कुलूप होतं. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर 16 जणांनी एकत्र येत पोलिसात धाव घेतली. प्राथमिक तपासा दरम्यान 200 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून रक्कम ही 300 कोटीच्या जवळपास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडार हा फेब्रुवारी पासून गायब आहे. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या खासगी वित्तीय संस्थेतील प्रतिनिधी अनेक गुंतवणूक दारांकडून पैसे घेत होते. ते आलेले पैसे  शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवायचे. अशा प्रकारे त्यांनी जाळे तयार केले होते. याच मार्गाने त्यांनी तब्बल 200  लोकांना किमान 300 कोटींचा गंडा घातला आहे.

(हेही वाचा “मशिदींची मुजोरी संपवावी…” राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर; पहा संपूर्ण व्हिडिओ)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here