Bangladeshi Infiltrators : आता बांगलादेशी घुसखोरांचे संकट नगरपर्यंत

दहशतवादी कारवायांशी घुसखोरांचा काही संबंध आहे का, कोणत्या घटनेत त्यांचा सहभाग होता याचा सखोल तपास सुरू

151
Bangladeshi Infiltrators : आता बांगलादेशी घुसखोरांचे संकट नगरपर्यंत
Bangladeshi Infiltrators : आता बांगलादेशी घुसखोरांचे संकट नगरपर्यंत

नाशिक आणि नगरच्या दहशतवादविरोधी पथकाने २३ ऑगस्टच्या सायंकाळी मोठी कारवाई केली आहे. मो. मोहिउद्दीन नाजीम शेख (३६, मूळ रा. मध्यम शोना पहाड, जि. चट्टोग्राम, बांगलादेश), शहाबुद्दीन जहांगीर खान (२७, मूळ रा. चांदिना, पो. कोंगाई, जि. कुमिया, बांगलादेश), दिलावर खान सिराजउल्ला खान (२७, मूळ रा. विष्णुपूर गाव, पो. कुतुबीरहाट, जि. नोहाखेरी, बांगलादेश), शहापरान जहाँगीर खान (वय २०, मूळ रा. चांदिना, पो. कोंगाई, जि. कुमिया, बांगलादेश) या ४ बांगलादेशी घुसखोरांना नगर येथून अटक करण्यात आली आहे. रासल एजाज शेख, सोहेल (रा. नोहाखेरी, बांगलादेश), माणिक खान, नोमान, अब्दुल कादर, कोबीर मंडल (रा. पश्चिम बंगाल) यांनी त्यांना घुसखोरी करण्यास मदत केली आहे. खंडाळा परिसरात एटीएसने छापा टाकून या संशयितांना ताब्यात घेतले.

(हेही वाचा – Heavy Rain In Himachal Pradesh : पावसाने मागील १२२ वर्षाचा विक्रम मोडला)

या दहा जणांविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, पारपत्र नियम १९५०, कलम ३ व ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परिच्छेद ३ (१)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून बनावट मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, जन्माचे दाखले, पासबुक जप्त करण्यात आले आहे. या सगळ्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे का, याचा तपस केला जात आहे.

रात्रभर चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा दहशतवादी कारवायांत सहभाग आहे का, याचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. दरम्यान, आरोपींना मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आदी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या १० जणांविरुद्धही गुन्हा दाखल केला.

घुसखोर कल्याणमार्गे महाराष्ट्रात

१. १० ते ११ वर्षांपूर्वी रासल एजाज शेख याने मोहिउद्दीन शेख याला बांगलादेशातून हसनाबादमार्गे पश्चिम बंगालमध्ये नेले. तेथून रेल्वेने कल्याणमध्ये आणले. तेव्हापासून तो भारतात अवैधरित्या राहतो. ७ ते ८ वर्षांपासून तो खंडाळा (नगर) येथे आहे. शेख याने रासल या दलालाला त्यासाठी १० हजार रुपये दिले.

२. शहाबुद्दीन जहांगीर खान याला सोहेल (रा. नोहाखेरी, बांगलादेश) याने ६ ते ७ वर्षांपूर्वी बांगलादेश येथून आगरतळा येथे आणले. तेथून कोलकाता व नंतर कल्याणमध्ये आणले. खानने सोहेल याला १७ हजार रुपये त्यासाठी दिले. मागील ८ महिन्यांपासून खान खंडाळ्यात राहतो.

३. दिलावर खान सिराजउल्ला खान यास माणिक खान याने ३ वर्षांपूर्वी बांगलादेश येथून आधी आगरतळा आणि नंतर कल्याण येथे आणले. माणिकने त्यासाठी १० हजार रुपये घेतले होते. खान गेल्या ३ महिन्यांपासून खंडाळा येथे राहत होता.

४. आरोपी शहापरान जहांगीर खान याला नोमान याने एक वर्षापूर्वी १५ हजार रुपये घेऊन बांगलादेश येथून आगरतळा, कल्याण येथे आणले. मागील ६ महिन्यांपासून खान खंडाळा येथे राहत होता.

तीन हजारांमध्ये बनावट कागदपत्रे

चारही संशयितांकडे मुंबई, कल्याण आणि सुरत (गुजरात) येथील स्थानिक पत्ते असलेले भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, तसेच काही बांगलादेशी ओळखपत्रे, लस घेतल्याची प्रमाणपत्रे, बांगलादेशी बँकेची कागदपत्रे आढळून आली. बांगलादेशमधील अब्दुल कादर, पश्चिम बंगालमधील कोबीर मंडल व मुंबईतील काही अनोळखी एजंटांनी, तसेच माणिक खान या व्यक्तीने ही कागदपत्रे १५०० ते ३ हजार रुपये घेऊन तयार करून दिल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले.

घुसखोरीचा उद्देश तपासणार 

नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रताप गिरी म्हणाले की, अटक केलेल्या चारही आरोपींकडे बनावट ओळखपत्रे सापडली आहेत. त्यांचा भारतात घुसखोरी करण्याचा उद्देश काय, त्यांना कोणी मदत केली, तसेच दहशतवादी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे का, कोणत्या घटनेत त्यांचा सहभाग होता याचा सखोल तपास सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.