Palghar News : पालघरमध्ये ४ कोटींची रोकड हस्तगत

70
Palghar News : पालघरमध्ये ४ कोटींची रोकड हस्तगत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्याचे प्रकार समोर येत आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत राज्यातील विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, मराठवाडा यांसह आता पालघरमधूनही मोठ्या रक्कमेची रोकड जप्त झाली आहे. (Palghar News)

९ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड सापडली. विक्रमगडकडे जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी केली असता ही रोकड आढळून आली. या वाहनाने ऐरोली, नवी मुंबई येथून वाडा, जव्हार, मोखाडा मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली आणि यातून कोट्यवधी रुपयांची रोकड उघड झाली. (Palghar News)

(हेही वाचा – BSE President Resigns : बीएसई कंपनीचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांचा राजीनामा)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा कठोर अंमल केला जात आहे. पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी केली जात आहे. वाडा पोलिसांना विक्रमगड मार्गावर संशयित व्हॅन दिसल्याने तपासणी केली असता त्यात तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून तिचा उपयोग निवडणुकीत होण्याची शक्यता असल्याचा संशय आहे. (Palghar News)

पालघर जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी सतर्क नजर ठेवली आहे. या अगोदरही महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी येथे पोलिसांनी चार कोटी पंचवीस लाखांची रोकड जप्त केली होती. तसेच विरार आणि नालासोपारा येथे नाकाबंदी दरम्यान सहा कोटी रुपयांची रोकड सापडली होती. (Palghar News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.