मध्य अमेरिकन देश होंडुरासमधील महिला तुरुंगात उसळलेल्या दंगलीत ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन टोळ्यांमध्ये बेकायदेशीर कारवायांमुळे झालेल्या हिंसाचारात त्यांचा जळून मृत्यू झाला. गोळीबार आणि चाकूच्या वाराने जखमी झालेल्या सुमारे ७ महिला कैद्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाविषयी माहिती दिली असून दरम्यान या तुरुंगात सुमारे ८०० हून अधिक कैदी आहेत.
होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी या संपूर्ण घटनेबाबत एक निवेदन जारी करत सांगितले आहे की, या दंगलीत बहुतेक महिला जळल्या आहेत. तर गोळीबारात गोळ्याही लागल्या आहेत. ही घटना होंडुरासची राजधानी तेगुसीगाल्पाच्या वायव्येस सुमारे ३० मैल असलेल्या तमारा तुरुंगात घडली. गंभीररित्या जखमी झालेल्या महिला कैद्यांवर तेगुसागाल्पा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(हेही वाचा – अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने पंतप्रधान मोदींची घेतली भेट)
देशाच्या तुरुंग यंत्रणेच्या प्रमुख जुलिसा विलानुएवा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून दंगलीत सहभागी संघटित टोळीवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच होंडुरासमधील तुरुंगाची अवस्था फारच वाईट असून २०१९ मध्येही असाच टोळीने हिंसाचार माजवला होता. त्या हिंसाचारात ३७ कैद्यांचा मृत्यू झाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community