Bogus crop insurance : ४२ हजार जणांनी उतरविला बोगस पीकविमा

78
Bogus crop insurance : ४२ हजार जणांनी उतरविला बोगस पीकविमा
Bogus crop insurance : ४२ हजार जणांनी उतरविला बोगस पीकविमा

सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार ०८६ शेतकऱ्यांनी ४७ हजार ११७ हेक्टर कांदा पिकाच्या (Onion crop) क्षेत्राचा बोगस विमा भरल्याचे (Bogus crop insurance) तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी फळबाग नसतानाही एक हजार ९०० जणांनी बोगस विमा उतरविल्याचे दिसून आले आहे. (Bogus crop insurance)

हेही वाचा-Ajit Pawar : शपथ घेणाऱ्या मंत्र्यांबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं विधान !

मात्र, याबाबतचे क्षेत्र निश्‍चित होऊ शकले नाही. या बोगस विमा भरलेल्या क्षेत्राच्या विम्यापोटी संबंधित शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम राज्य सरकारकडून जप्त केली जाणार आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये कांदा पेरणी क्षेत्रापेक्षाही अधिक क्षेत्राचा विमा उतरविल्याचा संशय कृषी आयुक्त कार्यालयाला आला. त्यानंतर कृषी खात्याकडून शेतकरीनिहाय प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी करण्यात आली. (Bogus crop insurance)

हेही वाचा-Bangladesh मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक !

या तपासणीत सोलापूरसह राज्यभरात बनावट विमा भरल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ९५३ शेतकऱ्यांनी ८५ हजार ७०७ हेक्टर कांदा क्षेत्रापोटी पीकविमा भरला होता. मात्र, जिल्ह्यात अंदाजे ३७ हजार २३० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी झाली होती. मात्र, तपासणीत ३५ हजार ४६३ शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेल्या २३ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर कांदा पीकच नसल्याचे उघड झाले आहे. तर चार ६२३ शेतकऱ्यांनी २४ हजार ७७ हेक्टर क्षेत्रासाठी भरलेला पीकविमा पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर भरल्याचेही तपासणीत दिसून आले आहे. अशाप्रकारे एकूण ४० हजार ८६ शेतकऱ्यांनी ४७ हजार ११७ हेक्टर क्षेत्राचा बोगस पीकविमा भरल्याचे स्पष्ट झाले आहे. (Bogus crop insurance)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.