- प्रतिनिधी
बांगलादेशी महिलांची भारतात घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली या महिलांना बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आणून त्यांचा डान्स बार तसेच कुंटणखाना येथे पुरवठा केला जात आहे. मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांना काम देण्याच्या नावाखाली मुंबईत आणून त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात लोटले जात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Bangladeshi Woman Arrested)
(हेही वाचा – विधानसभा जागा वाटपावर DCM Devendra Fadnavis यांचा आत्मविश्वास; महायुतीचा ‘पेपर’ जवळपास पूर्ण)
मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अलेक्झांडर सिनेमागृह येथे दोन बांगलादेशी महिला तेथील कुंटणखाण्यात येणार असल्याची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सदर ठिकाणी पाळत ठेवून दोन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडे त्यांचे ओळखपत्र तसेच आधार कार्डची मागणी करण्यात आली असता त्यांच्याकडे दोघांपैकी काहीही नव्हते. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्या दोघी बांगलादेशी नागरिक असल्याचे चौकशीत समोर आले. (Bangladeshi Woman Arrested)
(हेही वाचा – Bribery : आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाला लाच प्रकरणी अटक)
दोघीची अधिक चौकशी केली असता त्यांना काही दिवसांपूर्वी दलालांनी भारतात नोकरी देण्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने भारतात आणले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणून दोघींना देहव्यापाऱ्यात लोटले, अशी माहिती दोघींनी पोलिसांना दिली. नागपाडा पोलिसांनी या दोघींविरुद्ध बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी उलवे परिसरातून ३ बांगलादेशी महिलांना अटक केली. या तिघी मागील १५ वर्षांपासून नवी मुंबईत बेकायदेशीररित्या राहत होत्या, या तिघींकडे भारतीय असल्याचे बोगस कागदपत्रे मिळून आली आहे. (Bangladeshi Woman Arrested)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community