माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे, बाबा सिद्दीकीवर गोळ्या झाडणारा मुख्य शूटर्स शिवकुमार गौतम याला त्याच्या चार सहकाऱ्यांसह उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे. शिवकुमार गौतम याला मुंबई गुन्हे शाखेने यूपी एसटीएफच्या संयुक्त कारवाईत अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.गौतमला उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातुन अटक करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. गौतम व्यतिरिक्त, अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, अखिलेश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग या इतर चार संशयितांनाही गौतम फरार असताना त्याला मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे या प्रकरणाशी संबंधित अटक केलेल्यांची संख्या आता २३ वर पोहोचली आहे. (Baba Siddique Murder Case)
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेने यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या सहकार्याने शिवकुमार गौतम या शूटरला अटक केली, घटना घडल्यापासून सुमारे एक महिन्यापासून शिवकुमार हा फरार होता. (Baba Siddique Murder Case)
(हेही वाचा- स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या ‘हाताला’ निवडून देणार का?; Raj Thackeray यांचा सवाल)
मुंबई पोलिसांनी सांगितले की, एपीआय अमोल माळी (युनिट ५), पीएसआय स्वप्नील काळे (युनिट ७), पोलीस कॉन्स्टेबल विकास चव्हाण (युनिट ३) आणि महेश सावंत (युनिट७ ) यांचा समावेश असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे पथक होते. मागील २५दिवसांपासून आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींचा ठावठिकाणा असल्याची पुष्टी केल्यानंतर, STF, UP सोबत संयुक्त कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये एकूण २१ पोलिस अधिकारी आणि मुंबई गुन्हे शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ही कारवाई झाली. (Baba Siddique Murder Case)
“एपीआय अमोल माळी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई क्राइम ब्रँचच्या २६ अधिकाऱ्यांच्या पथकाने गौतमचा माग काढण्यात आणि त्याला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या अटकेमुळे या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण यश आले आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Baba Siddique Murder Case)
गौतम नेपाळला पळून जाणार होता, असे यूपी एसटीएफने म्हटले आहे
यूपी एसटीएफने रविवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गौतम नेपाळला पळून जाण्याची योजना आखत होता परंतु मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत त्याला वेळीच पकडण्यात आले. (Baba Siddique Murder Case)
त्यात म्हटले आहे की गौतमने पोलिसांना सांगितले की तो शुभम लोणकरच्या संपर्कात होता ज्याने त्याला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईशी बोलायला लावले.त्याने पोलिसांना सांगितले की, बाबा सिद्दीकीवर गोळी झाडल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला आणि पुणे येथे पोहोचला आणि वाटेत त्याचा मोबाईल फेकून दिला. त्यानंतर ते झाशीला गेले आणि नंतर लखनौला गेले. लखनौहून तो भराईचला गेला आणि पळून जात असताना त्याने पोलिसांना सांगितले की, तो सुभम आणि जिशान यांच्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांकडून फोन घेत असे. (Baba Siddique Murder Case)
यूपी एसटीएफने सांगितले की, आरोपींना मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आले असून ते त्यांची अधिक चौकशी करणार आहेत. (Baba Siddique Murder Case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community