Drugs : टांझानिया नागरिकाच्या पोटातून काढल्या कोकेनने भरलेल्या ५५ कॅप्सूल्स

75
Drugs : टांझानिया नागरिकाच्या पोटातून काढल्या कोकेनने भरलेल्या ५५ कॅप्सूल्स
  • प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका टांझानिया नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याच्या पोटातून कोकेन या अमली पदार्थाने (Drugs) भरलेले ५५ कॅप्सूल्स जप्त करण्यात आले. टांझानिया नागरिकाच्या पोटातून कोकेनने भरलेले कॅप्सूल्स काढण्यासाठी त्याला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ७५१ ग्रॅम असून त्याची किंमत साडेसात कोटी रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली. ही कारवाई मुंबई सीमाशुल्क विभागाने काही दिवसांपूर्वी केली असून याप्रकरणी टांझानिया नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – हुसेन दलवाईंनंतर Mallikarjun Kharge यांच्याकडून महाकुंभचा अवमान; म्हणाले, गंगेत डुबकी…)

लुखुमानी फहादी मावाकी असे अटक करण्यात आलेल्या टांझानिया नागरिकाचे नाव आहे. हा टांझानिया नागरिक टांझानिया येथून १९ जानेवारी रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला होता. सीमाशुल्क विभागाच्या अधिकारी यांना त्याच्यावर संशय येताच त्याला विमानतळावरील वॉशरूममध्ये आणण्यात आले व त्याच्या पोटातून प्रथम कोकेनने भरलेल्या १७ कॅप्सूल्स काढण्यात आल्या. त्यानंतर त्याला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असता २३ जानेवारी रोजी कोकेन (Drugs) ३८ कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या. सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टांझानिया नागरिकाकडून ७५१ ग्रॅम वजनाचे साडेसात कोटी रुपये किमतीच्या कोकेनने (Drugs) भरलेल्या ५५ कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या आहे. आरोपीने कॅप्सूल त्याने सेवन करून शरीरात लपवले होते असे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीला नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण)

दरम्यान, विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करी केलेले सोने आणि परदेशी चलनेही जप्त केली. २४-२५ जानेवारी दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ८६.६८ लाख रुपये किमतीचे १.१६ किलो सोने आणि एका प्रकरणात २२.४० लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. बाकू आणि जेद्दाह येथून येणाऱ्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मेणाच्या स्वरूपात २४ कॅरेट सोन्याचे डस्ट (पावडर) ज्याचे किंमत ७५.४७ लाख रुपये आहे आणि १५० ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचे बार जप्त करण्यात आले. ज्याचे मूल्य ११.२० लाख रुपये आहे. प्रवाशांच्या शरीरात आणि बुटांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते, असे एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार एका प्रवाशाला अटक करण्यात आली. हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशालाही अटक केली आणि त्यांच्याकडून २२.४० लाख रुपयांच्या समतुल्य परकीय चलन (एक लाख सौदी रियाल) जप्त केले हे चलन कपड्यांमध्ये लपवले होते अशी माहिती एआययू अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Drugs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.