Crime : अपहरण आणि खंडणी प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चिटणीसासह ६ जणांना अटक

94
Crime : अपहरण आणि खंडणी प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चिटणीसासह ६ जणांना अटक
  • प्रतिनिधी 

एका कंत्राटदाराच्या वडिलांचे अपहरण करून १० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चिटणीसासह ६ जणांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुजय शेखर ठोंबरे (३०), सुनील सखाराम राणे (५६), अरुण हरिश्चंद्र बोरले (५२), अरुण धोंडीराम शिर्के (२९), रोहित प्रवीण जाधव (२४) आणि मनोहर तुकाराम चव्हाण (३९) अशी अटक करण्यात आलेल्या ६ जणांची नावे आहेत. (Crime)

(हेही वाचा – Mahila Bachat Gat : गुढीपाडव्याला मिळणार महापालिकेच्या बचत गटांची घरपोच पुरणपोळी)

सुजय ठोंबरे हा कुर्ला पश्चिम न्यू मिल रोड, वसंत नगर येथे वास्तव्यास आहे. तर इतर पाच जण कफपरेड, चिरा बाजार, काळबादेवी, आणि नरिमन पॉईंट येथे राहणारे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय पांडुरंग मोरे हे नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथे राहण्यास आहे. मोरे हे कंत्राटदार असून फोर्ट येथे एका बँकेत कर्मचारी पुरवठा करण्याचे कंत्राट सुरू आहे. तक्रारदाराच्या फोर्ट येथील बँकेत काम करणाऱ्या १७ कंत्राटी कर्मचारी यांनी सोमवारी सकाळी किरकोळ कारणावरून अचानक काम बंद केले होते. (Crime)

(हेही वाचा – Kunal Kamra ला कंगना रणौत यांनी सुनावले; म्हणाले…)

याचा फायदा घेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सुजय ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारदाराच्या कंपनीचा सुपरवायझर सुजित कुमार सरोज याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तक्रारदाराचे वडील पांडुरंग मोरे यांना बळजबरीने वाहनात बसवून दादर येथील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या युनियन कार्यालयात आणून तडजोड करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी कंत्राटदार विजय मोरे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीची तक्रार दाखल केली. आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून कामगार सेना चिटणीस सुजय ठोंबरे याच्यासह ६ जणांना मंगळवारी अटक केली आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.