Tamil Selvan: आमदार कॅप्टन तामिळ सेलवनसह ६ जणांना तुरुंगवासाची शिक्षा

288
Tamil Selvan: आमदार कॅप्टन तामिळ सेलवनसह ६ जणांना तुरुंगवासाची शिक्षा
Tamil Selvan: आमदार कॅप्टन तामिळ सेलवनसह ६ जणांना तुरुंगवासाची शिक्षा

अँटॉप हिल परिसरातील इमारतींचा बेकायदा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक आमदार कॅप्टन तामिळ सेलवन यांच्यासह ६ जणांना दोषी ठरवत न्यायालयाने आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन, माजी नगरसेवक गजानन पाटील यांच्यासह ६ जणांना ६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी १३ हजार ५०० रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी गुरू तेग बहाद्दूर नगर (GTB) अँटॉप हिल येथील २५ इमारतीमध्ये असलेल्या बेकायदेशीर वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी आले असता स्थानिक भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेलवन, माजी नगरसेवक गजानन पाटील,जसबीरसिंग गुरुबकसिंग बिया,ललित चोप्रा,इंद्रापाल सिंग मारवा आणि दर्शन कोचर यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून महानगर पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता ही घटना २०१९मध्ये घडली होती.

(हेही वाचा – Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन पेटवले; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय)

या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात दंगल माजविणे, सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचारी यांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात आमदार कॅप्टन तामिळ सेलवन, माजी नगरसेवक गजानन पाटील,जसबीरसिंग गुरुबकसिंग बिया,ललित चोप्रा,इंद्रापाल सिंग मारवा आणि दर्शन कोचर यांना स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवून सोमवारी त्यांना ६ महिन्याची कैद आणि प्रत्येकी १३ हजार ५०० रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. ६ आरोपी पैकी आरोपी ललित चोप्रा यांचे निधन झाले आहे.आरोपींना शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी विशेष न्यायालयाने शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.