Cyber Fraud : एकट्या मुंबईकरांची सात महिन्यांत ६५० कोटींची सायबर लूट

346
Cyber Fraud : एकट्या मुंबईकरांची सात महिन्यांत ६५० कोटींची सायबर लूट

सायबर गुन्हेगारांनी मागील सात महिन्यांत एकट्या मुंबईतून ६५० कोटींची लूट केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या लुटीपैकी मुंबई पोलिसांना १०० कोटी रुपये वाचविण्यात यश आले आहे. २०२३ या वर्षात झालेल्या सायबर लुटीचा आकडेवारी पेक्षा या सात महिन्यांत झालेल्या लुटीचा आकडा तीन पटीने जास्त आहे. २०२३ मध्ये सायबर गुन्हेगारांनी संपूर्ण वर्षभरात २६५ कोटींची मुंबईकरांची लूट करण्यात आली होती. दरम्यान मागील सात महिन्यांत सायबर हेल्पलाईन क्रमांकावर ३५ हजार जणांनी कॉल करून आपली तक्रार दाखल केली होती अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने दिली आहे. (Cyber Fraud)

मुंबईत मागील वर्षांपेक्षा या वर्षी सायबर गुन्ह्यात तीन पटीने वाढ झाली आहे. सायबर गुन्हे शाखेकडून १ जानेवारी ते ३१ जुलै २०२४ या सात महिन्यांत मुंबईत झालेल्या सायबर गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबईत सात महिन्यांत सायबर गुन्हेगारांकडून ६५० कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये ही आकडेवारी २६५ कोटी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ सात महिन्यांत तीन पटीने सायबर लुटीचा आकडा वाढला आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत मुंबई पोलिसांना १०० कोटी रुपये गोठवण्यात यश आले. (Cyber Fraud)

(हेही वाचा – Farmers : नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार ५९६ कोटी; अनिल पाटील यांची माहिती)

उपलब्ध माहितीनुसार, या सात महिन्यांत सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर ३५ हजार कॉल आले आणि सायबर घोटाळेबाजांनी या लोकांना सुमारे ६५० कोटींचा घोटाळा केला. त्यापैकी पोलिसांनी १०० कोटी यशस्वीपणे गोठवले. फसवणुकीला आळा घालण्यासाठी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० सुरू करण्यात आला. सायबर फसवणुकीला बळी पडलेले कोणीही मदतीसाठी या नंबरवर कॉल करू शकतात. सायबर पोलिसांशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा कोणी सायबर फसवणुकीचा बळी ठरतो आणि हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरित तक्रार करतो तेव्हा उपस्थित असलेले पोलिस अधिकारी आणि तज्ञ त्वरीत पैसे हस्तांतरित केलेली बँक खाती गोठवून फसवणूक झालेली रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जाण्यापासून थांबवली जाते. (Cyber Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.