छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील दक्षिण अबुझमद भागात 7 नक्षलवादी ठार झाले. त्यात एका मोठ्या नक्षलवाद्याचाही समावेश आहे, जो रेड मिलिटंट्सच्या केंद्रीय समितीचा भाग होता. पहाटे तीन वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalist) गोळीबार सुरू आहे.
नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्याचे विशेष टास्क फोर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव रक्षक यांचे संयुक्त पथक दक्षिण अबुझमद भागात नक्षलविरोधी (Naxalist) शोध मोहीम राबवत होते. चकमकीत केंद्रीय समिती स्तरावरील नक्षलवादी (Naxalist) ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलविरोधी शोध मोहिमेत मंगळवारी विशेष टास्क फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलिसासह नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव रक्षक दक्षिण अबुझमद भागाकडे रवाना झाले होते.
Join Our WhatsApp Community