३९ वर्षांच्या नराधमाचे ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत दुचाकीवर बसून अश्लील चाळे, सीसीटीव्हीत घटना कैद

186

एका ३९ वर्षांच्या विकृत व्यक्तीनं सात वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याची घृणास्पद घटना भिवंडीत घडली आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्यामुळे विकृत व्यक्तीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गजाआड करण्यात आलं आहे. माहितीनुसार आशिक अली शहा असं आरोपीचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीमध्ये सात वर्षांची पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. २५ जानेवारीला ती बांगड्या खरेदी करण्यासाठी घरातून निघाली होती. तेव्हा तिला इमारतीच्या खाली नराधम भेटला. त्यानं तिला कुठं जातेस अशी विचारणा केली. तेव्हा तिनं बांगड्या खरेदी करायला जात असल्याचं सांगितलं. मग नराधमानं बांगड्या खरेदी करण्यासाठी पैसे देतो असं सांगितलं. पण मुलीनं पैसे घेण्यास नकार दिला. मुलगी नकार देत असल्यामुळे नराधमानं तुझे वडील माझे मित्र असल्याचं सांगत वडिलांकडे सोडण्याचा बहाणा केला आणि तिचं अपहरण केलं.

त्यानंतर पीडित मुलीला नराधम सोसायटीच्या पार्किंगमध्ये घेऊन गेला. एका दुचाकीवर तिला बसवलं आणि तिच्या मागं बसून अश्लील चाळे करू लागला. यामुळं पीडित मुलगी भयभीत झाली. तिनं घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट घर गाठलं. संपूर्ण घडलेला प्रकार तिनं आईला सांगितला. पीडित मुलीच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळताचं त्यांनी पोलिसात धाव घेतली. शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात भादंवि कलम ३६६ (ए), ३५४ आणि ३५५ (बी) आणि पोक्सो कायदा कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला. तसंच सीसीटीव्ही फुटेजचा तपास केल्यानंतर संबंधित नराधमाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

(हेही वाचा – घरी सोडण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.