-
प्रतिनिधी
वारसांच्या प्रतीक्षेत मागील एक वर्षांपासून मुंबईतील वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांतील शवागृहात असलेल्या ७५ बेवारस मृतदेह (Dead Body) पडून असल्यामुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. हे मृतदेह बहुतेक अज्ञात वाहनांच्या अपघातात मृत पावलेले, भिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांचे असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. या वेबवारस मृतदेहांची लवकर औपचारिकता पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ओळख पटलेल्या मृतदेहांच्या बाबतीत, पोलिस ठाण्यांना ते त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यास सांगण्यात आले आहे. जर मृतदेह ओळख पटलेले नसतील तर त्यांचे अंत्यसंस्कार करून त्यांची विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरातील सरकारी रुग्णालयातील शवागृहात मागील एक वर्षांपासून ओळख न पटलेले ७५ मृतदेह (Dead Body) पडून आहेत. हे मृतदेह अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत पावलेले, भिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि मृत अवस्थेत मिळून आलेले नवजात अर्भकाचे असल्याचे कळते. हे मृतदेह २०२३ ते २०२४ या कालावधीत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांना सापडले आहेत. हे मृतदेहांचे वारस मिळून न आल्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून हे मृतदेह वारसांच्या प्रतीक्षेत रुग्णालयातील शवागृहात पडून आहेत. नियमानुसार बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ७ दिवस ते एक महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत मृत व्यक्तीचे वारस भेटले नाही तर मृत व्यक्तीचा विशेरा आणि डीएनए नमुने काढून ते फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात यावे, मृत व्यक्तीचे छायाचित्र काढून ठेवणे आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावावी.
(हेही वाचा – Lalu Yadav यांच्या निकवर्तीय आमदारांच्या घरासह ११ ठिकाणावर पोलिसांची छापेमारी; बंदुक, ७७ लाखांचा…)
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) नुसार, मृतांचे फोटो सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही प्रसारित केले जातात,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी देखील तपासतो, परंतु जेव्हा आम्हाला मृताची ओळख पटवण्यात यश येत नाही, तो पर्यत मृतदेह (Dead Body) शवागृहात राहतात.”मृत व्यक्तीची ओळख पटवताना, पोलिस त्यांच्या कपड्यांवर खुणा, जन्मखूण शोधतात. अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीरावर नाव किंवा इतर टॅटू काढतात, त्यात धार्मिक चिन्हे, जोडीदाराची नावे किंवा असे काहीतरी टॅटू केलेले असते, ज्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीची किंवा त्याच्या धर्माची ओळख पटवण्यास मदत होते,” असे पोलिस अधिकारी म्हणाले. जर मृतदेहाची ओळख पटली तर त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु जर मृत व्यक्तीची ओळख पटली नाही तर मृतदेह शवागारातच राहतो, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
मुंबई महानगर (एमएमआर) दरमहा सरासरी सुमारे ३०० मृतदेह (Dead Body) मिळून येतात, त्यापैकी ६० टक्के मृतदेहाची ओळख पटते आणि ४० टक्के मृतदेहांचे वारस शोधण्याचे काम सुरू केले जाते. ओळख पटलेले मृतदेह औपचारिता पूर्ण करून वारसांच्या ताब्यात दिले जातात, आणि ओळख न पटलेले मृतदेह शवागृहात वारसांच्या प्रतीक्षेत असतात. वारस नसलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचे विशेरा आणि आणि डीएनए काढून ठेवण्यात येतात.मृतदेहाची ओळख वेळेवर केली गेली नाही तर ते मृतदेह शवागृहातील एअर कंडिशनिंग सिस्टमवरील भार वाढवतात,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “मग ते कुजण्यास सुरुवात करतात आणि घुशी देखील त्यांच्याकडे आकर्षित होतात. जरी बहुतेक शवागृहांमध्ये आता अत्याधुनिक शीतगृहे आणि मृतदेह ठेवण्यासाठी ट्रे सिस्टम आहेत, परंतु जेव्हा भार वाढतो तेव्हा समस्या कायम राहते.”
(हेही वाचा – Congress ची ७०० कोटींची मालमत्ता ईडी जप्त करणार; नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा चर्चेत)
पोलिस नियमावलीनुसार, बेवारस मृतदेहांची (Dead Body) सात ते ३० दिवसांत विल्हेवाट लावली पाहिजे. परंतु कामाचा ताण आणि नातेवाईकांना शोधण्यात अडचणी आल्यामुळे, हे मृतदेह अनेक महिने रुग्णालयात बेवारस पडून राहतात. जुहू येथील कूपर रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या बाबतीत, जून २०२४ पासून काही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. २०२१ पासून आमच्याकडे वाकोला पोलिस ठाण्यातून एक मृतदेह आहे.”
मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया
जर कोणी अनोळखी मृतदेहाचा (Dead Body) दावा करायला आले नाही, तर नमुने जतन केले जातात आणि मृताचे डीएनए प्रोफाइलिंग कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) मध्ये केले जाते. डीएनए प्रोफाइल काही महिन्यांसाठी फॉरेन्सिक मध्ये जतन केले जाते. “तपास अधिकाऱ्याला बोलावले जाते आणि सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, योग्य प्रक्रियेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते,” असे जेजे मार्ग पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “काही मृतदेह विविध वैद्यकीय महाविद्यालयांकडून शैक्षणिक कारणांसाठी देखील घेतले जातात.” पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतांपैकी बरेच जण ज्येष्ठ नागरिक आणि भिकारी आहेत ज्यांचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी कधीच येत नाहीत. रेल्वे अपघातांमध्ये, सुमारे २०टक्के मृतदेह बेवारस राहतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांचे आणि सोडून दिलेल्या बाळांचे मृतदेह बेवारस राहतात.
स्वयंसेवी संस्था ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक आणि सद्गती फाउंडेशनशी संबंधित व्यापारी किशोर भट्ट हे या बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्यास मदत करतात. “कोविड-१९ साथीच्या काळापासून, आम्ही बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्यास सुरुवात केली आहे,” असे समाजसेवक इकबाल ममदानी म्हणाले. “नंतर आम्ही अज्ञात मृतदेहांचे (Dead Body) अंतिम संस्कार करण्यास सुरुवात केली. सरासरी, आम्ही दररोज तीन ते चार अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावतो.” असे ममदानी यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community