Digital Arrest Scam ला ८५ वर्षीय महिला पडली बळी

187
Digital Scams : डिजिटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? सुरक्षिततेसाठी 'हे' आहेत ५ महत्त्वपूर्ण उपाय
  • प्रतिनिधी 

‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीला (Digital Arrest Scam) ठाण्यातील ८५ वर्षीय महिला बळी पडली आहे. सायबर गुन्हेगारांनी या ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेले असल्याचे सांगत या महिलेची १ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘डिजिटल अरेस्ट’ सायबर फसवणूक (Digital Arrest Scam) गुन्ह्याची नवीन पद्धत सायबर गुन्हेगारांकडून सुरू करण्यात आली आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पीडित व्यक्तीकडून लाखो रुपये ऑनलाईन उकळले जात आहेत. मुंबई, सह राज्यात तसेच देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’ चे दररोज मोठ्या संख्येने गुन्हे दाखल होत आहे. ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदार ८५ वर्षाच्या वयोवृद्ध महिला आहे. ११ सप्टेंबर रोजी पीडित वयोवृद्ध महिलेला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल करण्यात आला होता, कॉल करणाऱ्याने त्याचे नाव विजयकुमार असे सांगून तो दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Kangana Ranaut ला भाजपाने चांगलेच खडसावले; वादग्रस्त विधानापासून अंतर ठेवण्याची तंबी)

कॉल करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार पीडित महिलेला तिच्या बँक खात्यात फसवणुकीतील गुन्ह्यातील रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यातील आहे, त्यामुळे त्यांचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये असून त्याच्यावर मुंबई गुन्हे शाखेत एफआयआर दाखल झाला आहे, तसेच पीडितेच्या नावावर घाटकोपर येथून एक सिमकार्ड घेण्यात आले असून त्याचा वापर गुन्ह्यात करण्यात आला, आम्ही या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली असून त्यांनी तुमचा मोबाईल क्रमांक दिला आहे असे कॉल करणाऱ्या व्यक्तीने पीडित महिलेला सांगितले. पीडित महिलेने सर्व सूचनांचे पालन केले आणि एक महिला कॉल वर आली आणि तिने स्वतः पोलीस हवालदार असल्याचा दावा केला आणि तिने पीडित महिलेच्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर पोलीस गणवेशातील छायाचित्रे आणि ओळखपत्रे पाठवून खात्री करून दिली, त्यानंतर पीडितेला व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर तिने पीडितेला त्यांचे आधार कार्ड तपशील सादर करण्यास सांगितले. (Digital Arrest Scam)

त्यानंतर हेमराज नाव असल्याचा दावा करणाऱ्या आणखी एका व्यक्तीने मुंबई क्राईम ब्रँच मधून असल्याचे सांगून पीडितेशी व्हॉट्सॲप कॉलवर बोलणे केले. त्यानंतर कॉलरने पीडितेला सांगितले की, त्या मनी लाँड्रिंगमध्ये सापडल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेला सांगितले की, जर त्यांना या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल आणि क्लीन चिट मिळवायची असेल तर त्यांना दिलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतील. तपास पूर्ण होईपर्यंत हे पैसे आरबीआयकडे सुरक्षित ठेवले जातील आणि एकदा तपास पूर्ण झाला आणि पीडितेचे पैसे हिशोबी असल्याचे आढळल्यास ते त्याच्या बँक खात्यात परत केले जातील. (Digital Arrest Scam)

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेत उपायुक्त दिघावकर, चंदा जाधव यांच्या बदल्या)

त्यानंतर पीडित महिलेने तीन ऑनलाइन व्यवहारांतून १.२४ कोटी रुपये फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. १३ सप्टेंबर रोजी पीडितेने आलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून पैशाची चौकशी केली त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पैसे त्याच्या खात्यात जमा होतील असे पीडित महिलेला सांगण्यात आले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) (ओळख चोरी), ६६(डी)(संगणक संसाधनाचा वापर करून व्यक्तिरेखेद्वारे फसवणूक करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Digital Arrest Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.