Mumbai International Airport वर ९ कोटींचे सोने आणि हिरे जप्त

126
Mumbai Airport वर कोट्यवधी रुपयांच्या गांजासह एकाला अटक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईत ९ कोटी रुपये किमतीचे सोने आणि २१४७.२० कॅरेटचे हिरे जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या प्रवाशांनी परिधान बेल्ट बक्कल, ट्रॉली बॅग आणि अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवून ठेवलेले होते. (Mumbai International Airport)

एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये हिरे लपवून ठेवलेले आढळले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नियमित तपासणी आणि स्कॅनिंग प्रक्रियेदरम्यान, सीआयएसएफला मुंबईहून बँकॉकला NOK फ्लाइट क्रमांक DD-939 ने उड्डाण करणाऱ्या एका प्रवाशाच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्या. (Mumbai International Airport)

(हेही वाचा – Sanjay Raut यांच्या भावाचे वादग्रस्त विधान; म्हणाले, लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून…)

त्या व्यक्तीला तातडीने हवाई गुप्तचर विभाग (AIU) कडे सोपवण्यात आले. संपूर्ण तपासणीनंतर कस्टम अधिकाऱ्यांनी ४ कोटी ९३ लाख ५ हजार रुपये किमतीचे २१४७.२० कॅरेट हिरे जप्त करण्यात आले असून या प्रवाशाला अटक करण्यात आली. दरम्यान दुबईहून मुंबईला EK-500 ने आलेल्या 03 प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून ७७५ ग्रॅम वजनाच्या २४ कॅरेट गोल्ड रोडियम प्लेटेड रिंग्ज आणि बटणे जप्त करण्यात आली. ज्यांची किंमत ६१ हजार ४५ रुपये होती. (Mumbai International Airport)

प्रवाशांनी वाहून नेलेल्या बेल्ट बकल आणि ट्रॉली बॅगमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. दुसऱ्या कारवाईत नैरोबीहून मुंबईला आलेल्या १४ केनियन नागरिकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून २७४१ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट वितळलेले सोन्याचे बार आणि १.८५ कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.जप्त केलेले सोन्याचे बार आणि दागिने प्रवाशांच्याअंतर्वस्त्रांमध्ये आणि कपड्यांच्या खिशात लपवून ठेवण्यात आले होते. (Mumbai International Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.