- प्रतिनिधी
मुंबई ठाण्यातील वेश्यागृहात घुसखोर बांगलादेशी महिलांची संख्या वाढल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. मुंबईतील डी. बी. मार्ग पोलिसांनी ग्रँट रोड येथील सिम्प्लेक्स इमारत येथे केलेल्या कारवाईत ३ घुसखोर बांगलादेशी वारांगनांना अटक करण्यात आली असून, ठाण्यातील भिवंडी येथे ठाणे गुन्हे शाखेने हनुमान टेकडी येथून ६ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाया मागील २४ तासांत करण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशी महिलांची वेश्याव्यवसायात मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली असून बांगलादेशातील गरिबी, बेरोजगारीमुळे बांगलादेशी महिला बेकायदेशीररित्या या व्यवसायात आल्या असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Bangladeshi Women Arrested)
मुंबईतील ग्रँट रोड येथे असणाऱ्या सिम्प्लेक्स इमारतीत मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालतो. याठिकाणी पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करून अल्पवयीन मुली, तसेच बळजबरी वेश्याव्यवसायात लोटण्यात आलेल्या महिलांची सुटका करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिलांचे प्रमाण वाढले आहे. या महिलांना बेकायदेशीररित्या भारतात आणून त्यांना वेश्याव्यवसायात लोटले जाते. हे काम मुंबईतील आणि बांगलादेशी येथील दलाल मंडळी एकत्रित करतात. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आम्ही नियमित करित असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. (Bangladeshi Women Arrested)
(हेही वाचा – ST Corporation : अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाची त्रिसुत्री)
डी. बी. मार्ग पोलिसांनी नुकत्याच सिम्प्लेक्स इमारतीत केलेल्या कारवाईत ३ घुसखोर बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान ठाणे गुन्हे शाखेने भिवंडीतील हनुमान टेकडी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक केली. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या काही महिलाही बेकायदेशीर स्थलांतरित असल्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहितीच्या पडताळणीनंतर स्थानिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या समन्वयाने विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने हनुमान टेकडी, बॉम्बे चाळ, लेन क्रमांक १ आणि २, भिवंडी येथे छापा टाकून सहा बांगलादेशी महिलांना अटक केली असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Bangladeshi Women Arrested)
जेव्हा आमच्या टीम सदस्यांनी त्यांना कोणतेही वैध कागदपत्र विचारले, तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. या महिलांनी वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीमा ओलांडली आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील भिवंडी शहरात त्या भाड्याच्या घरात राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, १९२० च्या विविध कलम ३ आणि ४ आणि परदेशी कायदा, १९४६ च्या कलम १३ आणि १४-ए (बी) अंतर्गत महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून पुढील लिंक शोधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, ज्या घरमालकाने या महिलांना त्यांच्या बेकायदेशीर स्थितीची माहिती असूनही मालमत्ता भाड्याने दिली त्यांच्यावरही फॉरेनर्स अॅक्ट, १९४६ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bangladeshi Women Arrested)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community