Jalgaon Crime : जळगावमध्ये ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; मृतदेह लपवला गोठ्यात

190
Jalgaon Crime : जळगावमध्ये ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; मृतदेह लपवला गोठ्यात

गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील अत्याचारात (Jalgaon Crime) वाढ होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांवर अत्याचार करून नंतर त्यांची हत्या करण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे या आरोपीचे (Jalgaon Crime) नाव आहे. त्याने लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून दिल्याची कबूली देखील दिली आहे. दरम्यान या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – IND vs WI T20 : वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाचा पराभव)

देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेमध्ये माहिती

या घटनेचे (Jalgaon Crime) पडसाद अधिवेशनात देखील उमटले असून यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

गुन्ह्याची कबुली

ज्या गोठ्यात मुलीचा मृतदेह (Jalgaon Crime) मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्याने अखेर या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. जुलै ३० रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असताना गावात राहणाऱ्या स्वप्नीलने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर स्वप्निल पाटील याने मुलीसोबत जबरदस्ती केली. या दरम्यान स्वप्निलने दोनवेळा मुलीच्या डोक्यात गोठ्यात पडलेला दगड मारला. तसेच मुलीचा मृतदेह गोठ्यात असलेल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून दिला.

दुर्गंधी आल्याने प्रकार उघडकीस

दोन दिवसांपासून मृतदेह (Jalgaon Crime) कडब्यात असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला होता. गावातील महिला आणि नातेवाईकांनी भडगाव पोलिस स्टेशन गाठून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. तसेच पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.