मुंबई महानगर पालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित पाटकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताचा समावेश आहे. संशयित आरोपींना दोन कोटी रुपये मिळाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालात म्हटले असून सुजित पाटकर यांना कंत्राट मिळवून देण्यासाठी ४५ लाख देण्यात आल्याचा खुलासा आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचे कंत्राट बेकायदेशीररित्या मिळवलेच नाही तर, त्यांनी कराराचे उल्लंघन करून दुसर्या संस्थेला उपकंत्राटही दिले असल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. याशिवाय, करारानुसार कंत्राटदाराला प्रत्येकी ३०० ग्रॅम वजनाची पाकिटे तयार करणे आवश्यक होते. परंतु, आरोपींकडून १०० ग्रॅम ते २०० ग्रॅम वजनाचे खाद्यपदार्थ दिले, असे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. आरोपींनी मनपाची ६.३ कोटी रुपयांची फसवणूक केली.
(हेही वाचा – Ganeshotsav Special: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एक लेन खुली होणार)
आर्थिक गुन्हे शाखेने १ सप्टेंबर रोजी सुनील उर्फ बाळा कदम, राजू साळुंखे, सुजित पाटकर, संजय राऊत यांचे सहकारी, फोर्सवन मल्टीसर्विसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहल कॅटर्सचे भागीदार आणि मनपाचे माजी सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून नाव घेण्यात आले आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात या संशयित आरोपीविरुद्ध फसवणूक, विश्वासभंग आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक आता सर्व आरोपींच्या बँक खात्याचे तपशील गोळा करत आहे आणि त्यानंतर ते प्रत्येक आरोपीला त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community