Cyber Crime : सावध रहा! आवाज क्लोन करून केली जात आहे ऑनलाईन फसवणूक

अंधेरी जे. बी. नगर परिसरात राहणारे ६९ वर्षीय व्यवसायिकाच्या परदेशात असलेल्या पुतण्याचा आवाज क्लोन करून या व्यवसायिकाकडून ३ लाख रुपये उकळण्यात आले आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

220
Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका

नवनवीन तंत्रज्ञानासोबतच ऑनलाईन फसवणुकीचे नवीन प्रकार समोर येत आहे. डीपफेक, ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ (AI) आधारित प्रणालीचा वापर करून सायबर गुन्हेगाराकडून आर्थिक फसवणूकीचे प्रकार सुरू आहे. या तंत्रज्ञानासोबत व्हॉइस चेंजिंग सॉफ्टवेअर अँपचा वापर करून आवाजाचे क्लोनिंग करून आर्थिक फसवणुक केली जात असल्याचा प्रकार मुंबईतील अंधेरी येथे उघडकीस आला. (Cyber Crime)

अंधेरी जे. बी. नगर परिसरात राहणारे ६९ वर्षीय व्यवसायिकाच्या परदेशात असलेल्या पुतण्याचा आवाज क्लोन करून या व्यवसायिकाकडून ३ लाख रुपये उकळण्यात आले आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी सकाळी या व्यावसायिकाला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. या कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज व्यवसायिकाचा परदेशात राहणाऱ्या मोठ्या भावाच्या मुलाचा (पुतण्या) आवाजासारखा त्यांना ऐकू आला. (Cyber Crime)

(हेही वाचा – ICC T20i Ranking : अक्षर पटेल आणि यशस्वी जयसवाल यांची टी-२० क्रमवारीत आगेकूच)

अशी केली फसवणूक 

पुतण्याच्या आवाजातून बोलणाऱ्या व्यक्तीने व्यवसायिकाला सांगितले की, मी २२ जानेवारी रोजी काही व्यवसायासंबंधी भारतात परतत असून त्याने त्यांच्या खात्यावर १० लाख रुपये पाठवले आहेत. त्याने ही बाब आपल्या वडिलांना हे सांगू नका अशी विनंतीही केली, त्याच दिवशी दुपारी व्यवसायिकाला दुसर्‍या क्रमांकावरून कॉल आला आणि तो पुन्हा त्याचा पुतण्याचा आवाज होता, त्याने त्याला सांगितले की आपण पैसे पाठवले आहेत आणि येत्या २४ तासात ते त्याच्या खात्यात जमा केले जातील. नंतर त्यांना पुतण्याने त्याला पुन्हा फोन केला आणि जगमोहन नावाच्या व्यक्तीने आपले अपहरण केल्याचे सांगून पाठवलेल्या पैशातून खंडणीची रक्कम देण्यास सांगितले अन्यथा जगमोहन त्याचा पासपोर्ट फाडून टाकेल असे सांगण्यात आले. (Cyber Crime)

घाबरलेल्या व्यवसायिकाने जगमोहनचा मित्र करणच्या खात्यात ३.७० लाख रुपये जमा केले. पैसे दिल्यानंतर व्यवसायिकाने आपल्या पुतण्याला फोन करून खंडणीची रक्कम जमा केल्याची माहिती दिली. काही वेळाने व्यवसायिकाला संशय आल्यामुळे त्यांनी पुतण्याला थेट कॉल करून पैसे पाठवल्याची पावती पाठवली असता ही कसली पावती आहे, असे पुतण्याने विचारले असता त्यांचा संशय खरा ठरला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यवसायिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करण्यासाठी व्हॉइस चेंजिंग सॉफ्टवेअर अॅप किंवा ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ (AI) आधारित प्रणालीचा वापर केला असावा असाही पोलिसांना संशय आहे. या फसवणुकीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यात आले त्या खात्याची माहिती मिळविण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Cyber Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.