Sexual Assault : नामांकित स्टील कंपनीच्या अध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, उद्योगपती हे एक शक्तिशाली असल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला इजा पोहचवू शकतो,  या भीतीने तिने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला नाही. या सर्व घटनेमुळे पीडिताला धक्का बसला होता व नैराश्य आले होते.

230
Sexual assault : देशातील एका नामांकित स्टील कंपनीच्या अध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 
एका ३० वर्षीय डॉक्टर महिलेने एका नामांकित कंपनीचे अब्जाधीश अध्यक्ष असलेल्या उद्योजकाविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी उद्योजक यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७६ ( लैंगिक अत्याचार),३५४ (विनयभंग) आणि ५०६ (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित डॉक्टर तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की,२४ जानेवारी २०२२ रोजी उद्योजक यांनी कथितपणे तिचा हात धरला आणि तिला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील त्यांच्या कॉर्पोरेट इमारतीच्यावर असलेल्या पेंटहाऊसच्या बाथरूममध्ये नेले जेथे त्याने कथितपणे तिच्यावर तिच्या मर्जीविरुद्ध लैंगिक कृत्य केले असा आरोप पीडितेने केला आहे.

दुबईत झाली भेट

पीडितेची उद्योजकासोबत ८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईत क्रिकेट स्टेडियममध्ये (इंडियन प्रीमियर लीग) आयपीएल सामना पाहण्यासाठी दुबईला गेल्यावर तिची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, २५ डिसेंबर रोजी वांद्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली व या सर्व भेटी दरम्यान त्याने त्याच्या कुटुंबातील घडामोडींची माहिती दिली आणि तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असे पीडितेने जबाबात म्हटले आहे. २६  डिसेंबर २०२१ रोजी उद्योजक तिच्या घरी आला आणि दोघे गाडी चालवायला गेले. या दरम्यान त्याने तिला एक बंगला, कार भेट देण्याचे आणि तिला व्यवसायात घेण्याचे वचन दिले.

पेंटहाऊसच्या बाथरूममध्ये मर्जीविरुद्ध केले लैंगिक कृत्य

२७  डिसेंबर २०२१  रोजी उद्योजकाने  तिला पेडर रोडवरील त्याच्या मॅन्शनमध्ये बोलावले, जिथे त्यांनी लग्नाच्या प्लॅनिंगवर  चर्चा केली. तिची परवानगी न घेता त्याने तिला पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. २४ जानेवारी २०२२रोजी उद्योजक यांनी कथितपणे तिचा हात धरला आणि तिला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील त्यांच्या कॉर्पोरेट इमारतीच्या वर असलेल्या पेंटहाऊसच्या बाथरूममध्ये नेले जेथे त्याने कथितपणे तिच्यावर तिच्या मर्जीविरुद्ध लैंगिक कृत्य केले असा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर त्याने पीडितेला टाळण्यास सुरुवात केली, त्याने तिचा मोबाईल क्रमाक ब्लॉक केला.

बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, उद्योगपती हे एक शक्तिशाली असल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला इजा पोहचवू शकतो, या भीतीने तिने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला नाही. या सर्व घटनेमुळे पीडिताला धक्का बसला होता व नैराश्य आले होते. तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला आणि त्यांनी तीला धीर देऊन तक्रार करण्यास सांगितले. तिने धाडस करून १६ फेब्रुवारी २०२३ रोजी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. दरम्यान उद्योजकाने तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता असे ही पीडितेने म्हटले आहे. त्यांनी तिला मोठी रक्कम देण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नकार दिला असे पीडितेने म्हटले आहे. अखेर १३ डिसेंबर २०२३ रोजी बीकेसी पोलिसांनी उद्योजकावर लैंगिक अत्याचार, धमकी देणे, आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.