Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव

71
Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या एका नव्या खुलासामध्ये, या प्रकरणातील एक शूटर गौरव विलास अपुणे हा बिश्नोई टोळीच्या ‘प्लॅन बी’ चा भाग म्हणून गोळीबाराचा सराव करण्यासाठी झारखंडला गेला होता. अपुणे यांच्यासोबत रूपेश मोहोळ हा दुसरा संशयित आधीच अटकेत होता आणि दोघांनी झारखंडमध्ये गोळीबाराचा सराव केला. शुभम लोणकर हा या सर्व कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच शूटर्सच्या सरावाची व्यवस्था केली आणि त्यांना पिस्तुल पुरवले होते. तथापि, गुन्हे शाखेचे अधिकारी अजूनही झारखंडमधील नेमके ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या ठिकाणी गोळीबाराचा सराव झाला होता. ५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अपुणे यांनी चौकशीदरम्यान ही धक्कादायक माहिती उघड केली. दरम्यान गुरुवारी क्राईम ब्रँचने आणखी दोघांना पुण्यातील कर्वे रोड येथून केली आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार )

आदित्य राजू गुळणकर (२२) आणि रफिक नियाज शेख (२२) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे असून, दोघेही पुण्यातील कर्वे नगर येथील रहिवासी आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही आरोपी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रवीण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते. मुंबई क्राइम ब्रँचमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव अपुणे आणि रूपेश मोहोळ यांनी २८ जुलै २०२४ रोजी झारखंडला प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला. ते तेथून २९ जुलै रोजी पुण्यात परतले आणि शुभम लोणकरच्या संपर्कात राहिले. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने उघड केले की, झारखंडला जाण्यापूर्वी, अपुणेने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की तो मित्रांसह उज्जैनला पिकनिकला जात आहे, त्यांना खुनाच्या कटातील सहभागाबद्दल आणि शूटिंगच्या सरावाच्या योजनांबद्दल माहिती नाही. (Baba Siddique)

(हेही वाचा – Crime : बांगलादेशातून भारतात महिलांची तस्करी; ठाण्यातील हॉटेलमध्ये सापडल्या १४ तरुणी)

गुन्हे शाखेच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बिश्नोई टोळीच्या आदेशानुसार शुभम लोणकर याने हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार अटक संशयितांना – रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहाड आणि गौरव अपुणे यांना चार मोठे बक्षीस देण्याचे आश्वासन दिल्याचे तपासात आढळून आले. त्यांना बाबा सिद्दीकींच्या (Baba Siddique) हत्येसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये, एक अपार्टमेंट, एक कार आणि दुबईची सहल बक्षीस म्हणून देण्यात येणार होते. या चौघांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आमिष दाखवून ‘प्लॅन बी’ साठी एकूण सहा शूटर्सची भरती करण्यात आली होती, असेही तपासातून समोर आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.