Jaish-E-Mohammed चा एक गट सोशल मीडियावर कार्यरत; तरुणांना हेरून करतात दहशतवादी संघटनेत सामील

49
Jaish-E-Mohammed चा एक गट सोशल मीडियावर कार्यरत; तरुणांना हेरून करतात दहशतवादी संघटनेत सामील
  • प्रतिनिधी 

‘जैश-ए-मोहम्मद’ (Jaish-E-Mohammed) या दहशतवादी संघटनेकडून भारतात घातपातासाठी ‘सोशल प्लॅटफॉर्म’ च्या माध्यमातून मुस्लिम तरुणांना तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेतील फराहतुल्ला घौरी हा तरुणांना संघटनेत भरती करणाऱ्या गटाचे नेतृत्त्व करीत असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि राज्य एटीएसने मागील आठवड्यात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील २६ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात एनआयएने (NIA) महाराष्ट्रातील मालेगाव, संभाजीनगर आणि जालना येथून काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. आसाम, महाराष्ट्र, यूपी, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर राज्यातील २६ ठिकाणी छापा टाकल्यानंतर शेख सुलतान सलाह उद्दीन अयुबी याला दिल्लीतून अटक करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना नोटीस देऊन तसेच देशातून बाहेर न जाण्याच्या व पोलिसांनी बोलविल्यास चौकशीसाठी हजर राहण्याच्या अटीवर सोडण्यात आले आहे.

(हेही वाचा – Attacks on Hindus : दुर्गापुजेची वर्गणी मागणाऱ्या हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला, एकाचा मृत्यू)

पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ (Jaish-E-Mohammed) या संघटनेशी संबंधित संशयिताकडून देशातील तरुणांची माथी भडकावून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात गुंतले होते आणि दहशतवादाशी संबंधित प्रचार करण्यात गुंतले होते अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा नेता फराहतुल्ला घौरी हा पाकिस्तानमधून एका गटाचे नेतृत्व करीत आहे. हा गट सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, या गटाकडून भारतातील मुस्लिम तरुणांना घेरले जात आहे, टेलिग्राम, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल प्लॅटफॉर्म हा गट तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून जिहादी बनवण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मघाती बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.

(हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने BJP ची खरडपट्टी का काढली ?)

या गटाने भारतात सोशल प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्लीपर सेल तयार केले, हे स्लीपर सेल या गटासाठी काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ (Jaish-E-Mohammed) या दहशतवादी संघटनेकडून प्रेरित झालेले मुस्लिम तरुण जमात संघटनेत भरती होत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले. या संशयित तरुणांना भारतभर हिंसक दहशतवादी हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात येत होते, अशीही धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेत इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, युनानी आणि आयुर्वेदिक डॉक्टर असून ही संघटना एकमेकांना संदेश पाठविण्यासाठी भारतात बंदी असलेल्या आंतरराष्ट्रीय अप्लिकेशनचा वापर करीत आहे. प्रत्यक्ष्यात कोणीही कुणाच्या संपर्कात नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.