
-
प्रतिनिधी
मुंबईसह राज्यभरात घुसखोर मुस्लिम बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात हिंदू नावाने बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत आहे. साकिनाका पोलिसांनी नुकतीच एका बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. शाहिदा आलमगीर मुल्ला वय वर्षे २३ ही दीड वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आली होती. या काळात तिने माही चौधरी असे हिंदू नाव परिधान केले आणि भारतीय एजंटच्या मदतीने बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय असल्याचे निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी तयार करून मुंबईतील गोरेगाव लिंक रोड येथे एका इमारतीत राहत होती. (Bangladeshi Infiltrators)
(हेही वाचा – पुणेकरांनो सावधान! कचरा जाळताना दिसल्यास ‘Special Squad’चे पथक करणार कारवाई)
साकिनाका पोलिसांनी शाहिदा उर्फ माही चौधरीला नुकतीच अटक केली आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शाहिदाची माही बनविणाऱ्या एजंटचा शोध घेण्यात येत आहे. शाहिदा आलमगीर मुल्ला ही तरुणी मूळची बांगलादेशातील नोराईल जिल्हा, पाटणा, ठाणा कालिया येथे राहणारी आहे. २३ वर्षांची शाहिदा हिला मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये करिअर करायचे होते, त्यासाठी तिने एजंटमार्फत चोरट्या मार्गाने भारतात बेकायदेशीर प्रवेश केला. (Bangladeshi Infiltrators)
तेथून भारतीय एजंटच्या मदतीने मुंबईत दाखल झाली होती, त्या एजंटने मुंबईत राहण्याची सोय करून दिली होती, तसेच माही चौधरी या नावाने तिचे भारतीय असल्याचे कागदपत्रे तयार करण्यात आले. त्यानंतर माही चौधरी नावाने भारतीय निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड आणि भारतीय असल्याचे इतर खोटे पुरावे तयार करून दिले असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिदा मुल्ला उर्फ माही चौधरीला मॉडेलिंग तसेच बॉलिवूड मध्ये आपले करिअर करायचे होते, त्यासाठी तिला भारतीय ओळख निर्माण करण्यासाठी तिने नाव बदलले आणि माही चौधरी या नावाने वावरत होती. साकिनाका पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला खोटी कागदपत्रे तयार करून देणाऱ्या एजंटचा पोलिस माग काढत आहे. (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community