Sakinaka Murder & Suicide Case : लुडो गेम खेळताना झालेल्या वादात सहकाऱ्याची हत्या करून एकाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला काजूपाडा ठिकाणी असलेल्या घास कंपाउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गारमेंट व्यवसायांपैकी एका गारमेंट कारखान्यात मृत इसम कारागीर म्हणून काम करीत होता.

365
Murder : मानखुर्दमधील तरुणीची हत्या, टॅक्सी चालक निजामुद्दीन अलीला अटक

लुडो (Ludo Game) खेळण्याच्या वादातून सहकाऱ्याची हत्या (Murder) करून स्वतः गळफास लावून आत्महत्या  (Suicide) केल्याची धक्कादायक घटना साकीनाका (Sakinaka) काजूपाडा येथे बुधवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली आहे. हे दोघे साकीनाका काजूपाडा घास कंपाउंड येथील एका गारमेंट कारखान्यात (Garments Factory) कारागीर म्हणून काम करीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेप्रकरणी साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police Station) हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Sakinaka Murder & Suicide Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला काजूपाडा (Kurla Kajupada) ठिकाणी असलेल्या घास कंपाउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गारमेंट व्यवसायांपैकी एका गारमेंट कारखान्यात मृत इसम कारागीर म्हणून काम करीत होता. त्याच्यासोबत मृत आरोपी देखील काम करीत होता व दोघे गारमेंट कारखान्यातच राहण्यास होते. दोघांचे कुटुंब उत्तर प्रदेशात आहे. (Sakinaka Murder & Suicide Case)

बुधवारी सकाळी गारमेंट कारखान्यातील इतर कारागीर आले असता कारखान्याच्या दरवाजा आतून बंद होता व आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे एकाने खिडकीतून बघितले असता दोघांपैकी एक जण गळफास अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती साकीनाका पोलिसांना (Sakinaka Police Station) देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारखान्याचे दार तोडून आत प्रवेश केला असता एक कारागीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, बाजूला रक्ताने माखलेली कैची पडली होती, तर दुसरीकडे एकाने गळफास लावलेल्या अवस्थेत लटकलेला होता. (Sakinaka Murder & Suicide Case)

(हेही वाचा – ZEE-Sony Merger : विलिनीकरणावर चर्चा नाही, झी कंपनीचे नवीन व्यवहार सेबीच्या रडारवर)

हत्येचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) आणले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे, पोलीस निरीक्षक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा साकीनाका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गबाजी चिमटे यांनी दिली. (Sakinaka Police Ragister Murder Case)

मृत आरोपी हा रागीट स्वभावाचा होता, गावाकडील कौटुंबिक कलहामुळे तो तणावात होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही मृत कारागीर रात्री बाहेरून जेवण करून झोपण्यासाठी कारखान्यावर आले होते, त्यानंतर दोघे झोपण्यापूर्वी ‘लुडो गेम’ (Ludo Game) खेळत असताना दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणातून आरोपीने कापड कापण्याची कैची घेऊन मयत इसमाच्या गळ्यावर वार केला, सहकारी मृत झाल्याचे बघून घाबरलेल्या आरोपीने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली. (Sakinaka Murder & Suicide Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.