पश्चिम मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका तरुणाला नालासोपारा येथून अटक केली आहे. मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग होण्याची महिन्याभरातील ही दुसरी घटना असून वाढत्या घटमामुळे महिला प्रवासी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
(हेही वाचा – GST Rate : अर्थ मंत्रालयाकडून सामान्यांना भेट; ‘या’ वस्तूंवरील GST मध्ये झाली कपात)
नेमका प्रकार काय?
पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी (२३ जून) रात्री नातेवाईकांना भेटण्यासाठी चर्नी रोड येथे लोकलने जात होती. मोटरमनच्या केबीन ला लागून असलेल्या महिला डब्ब्यातून ती प्रवास करत होती. अशातच ग्रॅन्ट रोड स्थानकावर एक अज्ञात व्यक्ती त्या ट्रेनच्या डब्यात घुसला आणि त्याने त्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने अश्लील भाषेचाही उपयोग केला. त्यानंतर तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून तेथून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी (२८ जून) मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुन्हेगाराच्या शोधासाठी कॉल रेकॉर्डचे विश्लेषण केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत तपास पथकाने नालासोपारा येथून आरोपी रोशन गिरीश पटेल (२०) याला अटक केली. रोशन पटेल हा सीताराम मिल कंपाउंड , जे.आर. बोरीचा मार्ग लोअरपरळ येथे राहणारा आहे असे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community