Crime : पश्चिम बंगालच्या शिकारीने मुंबईत येऊन सुरू केली खुनाची मालिका

पत्नीच्या हत्येत शिकारीला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती, त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

188

वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या खुन्यात दिल्ली येथून ६ महिन्यांनी अटक करण्यात आलेला पश्चिम बंगालचा बिपुल शिकारीने मुंबईतील वडाळा येथे एका महिन्यात तीन जणांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. तसेच यापूर्वी त्याने पश्चिम बंगालमध्ये २ वर्षांच्या मुलीची आणि पत्नीची हत्या (Crime) केली होती. पत्नीच्या हत्येत शिकारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याने मुंबईत जानेवारी महिन्यात तिघांची हत्या केली, त्यापैकी एका १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह ३ मार्च रोजी वडाळा खाडीलगत मिळाला असून दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.

मुंबईतील वडाळा टीटी येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यात गेल्या आठवड्यात दिल्ली येथून अटक करण्यात आलेला खुंखार खुनी बिपुल शिकारी याने मुंबईत ३ जणांची हत्या केली, तर पश्चिम बंगालमध्ये पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची कबुली शिकारीने पोलिसांना दिली. पत्नीच्या हत्येत शिकारीला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती, त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कोरोना काळात शिकारी हा पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर तो तुरुंगात परत गेलाच नाही आणि मुंबईत पळून आला होता, तो पश्चिम बंगालमधील मित्र राजू मंडल यांच्या वडाळ्यातील घरात राहू लागला. डिसेंबर २०२३ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजू मंडल हा अचानक गायब झाला होता, त्याच्या पाठोपाठ वडाळा परिसरात राहणारा १२ वर्षांचा मुलगा १२ जानेवारी रोजी बेपत्ता झाला. याप्रकरणी १४ जानेवारी रोजी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता, या मुलाचा शोध सुरू असताना २८ जानेवारी रोजी त्याच परिसरातून आणखी एक १२ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. ३ मार्च रोजी त्याचा मृतदेह वडाळा टीटी येथील खाडीजवळ कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. या प्रकरणात शिकारीला दिल्लीतून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली.

(हेही वाचा विशाळगडावरील अतिक्रमणावर कारवाई कायद्यानुसारच; राज्य सरकारने Bombay High Court मध्ये सादर केले प्रतिज्ञापत्र)

मुंबई पोलिसांच्या चौकशीत त्याने आणखी दोन हत्येची कबुली दिली, सर्वात प्रथम शिकारीने त्याचा रुम पार्टनर राजू मंडल याची डिसेंबर २०२३ मध्ये हत्या करून मृतदेह वडाळा येथील कंदळवनात फेकून दिला. त्यानंतर १२ जानेवारी रोजी घरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाची हत्या केली, त्याचा मृतदेहदेखील कंदळवनात त्याच ठिकाणी फेकला. २८ जानेवारी रोजी १२ वर्षांच्या दुसऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार (Crime) करून त्याचे मुंडके धडापासून वेगळे करून मृतदेह खाडीत फेकला, अशी कबुली शिकरीने वडाळा टीटी पोलिसांना दिली. तसेच पश्चिम बंगालमध्ये पत्नीच्या हत्येपूर्वी पत्नीला पहिल्या पतीपासून झालेल्या २ वर्षाच्या मुलीची हत्या केली होती, या गुन्ह्यात त्याला अटक झालेली नव्हती. बिपुल शिकारीने वडाळा पोलिसांना राजू मंडल आणि दुसऱ्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह फेकला ती जागा दाखवली असून मागील तीन ते चार दिवसांपासून वडाळा टीटी पोलिस ठाण्याकडून या दोन्ही मृतदेहांचा शोध घेसुरु असून अद्याप दोन्ही मृतदेह मिळाले नाही. मृतदेह शोधण्यासाठी वडाळा टीटी पोलिसाकडून अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.