Mumbai Police : कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला दरोडेखोर

सूरज ढोकरे (३७) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

121
Mumbai Police : कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला दरोडेखोर
Mumbai Police : कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला दरोडेखोर

मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने कर्जातून मुक्त होण्यासाठी दरोड्याचा मार्ग पत्करून भिवंडी तालुक्यातील पडघा येथे दरोड्याच्या प्रयत्नात दोन जणांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या या पोलीस शिपायाला अहमदनगर येथून पडघा पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Police)

सूरज ढोकरे (३७) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंधे गावाजवळ असणाऱ्या रस्त्यावर दोन इसमावर गोळीबार करून हल्लेखोराने पळ काढला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गोळीबार दरोड्याच्या हेतूने झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. पडघा पोलिसांनी तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला असता हल्लेखोर हा अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Mumbai Police)

(हेही वाचा – Crime : ड्रगमाफिया ललित पाटील पळाला की पळवला, गूढ कायम…)

पडघा पोलिसांनी अहमदनगर पोलिसांच्या मदतीने सूरज ढोकरे याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता तो मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरीला आहे. त्याने वेगवेगळ्या बँक, पतपेढी मधून कर्ज काढले होते. या कर्जाची रक्कम ४० ते ४२ लाखात गेली होती, हे कर्ज फेडण्यासाठी त्याने दरोड्याचा मार्ग पत्करला होता अशी माहिती तपासात समोर आली. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.