Police Constable Assaulted : महिला डब्ब्यात तैनात पोलीस असुरक्षित

महिला डब्ब्यात तैनात पोलिसावर हल्ला

133
Police Constable Assaulted : महिला डब्ब्यात तैनात पोलीस असुरक्षित
Police Constable Assaulted : महिला डब्ब्यात तैनात पोलीस असुरक्षित

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्ब्यात तैनात करण्यात आलेले पोलीस देखील सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात तैनात असलेल्या एका पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना जुईनगर येथे नुकतीच समोर आली आहे.

आकाश भारुड असे मारहाण झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भारुड हे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात तैनात असून १३ ऑगस्ट रोजी रात्री त्यांची ठाणे पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात गस्तीसाठी नेमणूक करण्यात आली होती. महिलांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्ब्यात गस्तीवर असताना ट्रेन रात्री साडे अकरा वाजता जुईनगर रेल्वे स्थानकावर येताच एक इसम महिला डब्ब्यात चढला. मद्यधुंद अवस्थेत असलेला या इसमाला भारुड यांनी हटकले मात्र ट्रेन सुरू झाल्यामुळे त्याला पुढच्या स्थानकावर उतरण्यास सांगितले.

(हेही वाचा – Delhi Crime :माणुसकीला काळिमा : गर्लफ्रेंडने केली बॉयफ्रेंडच्या मुलाची हत्या)

पोलीस शिपाई भारुड यांनी त्याला हटकले असता मद्यपान केलेल्या इसमाने भारुड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली व भारुड यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करू लागला. या प्रकारामुळे डब्ब्यातील महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कोपरखैरणे स्थानक येताच दुसऱ्या डब्ब्यातील पुरूष प्रवासी पोलीस शिपाई भारुड यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी मद्यपीच्या तावडीतून भारुड यांची सुटका करून ठाणे रेल्वे स्थानकात तैनात आलेल्या पोलिसांच्या ताब्यात मद्यपी इसमाला दिले.

पोलीस शिपाई भारुड यांना लाथा बुक्यांनी छातीत पोटात मारल्यामुळे भारुड यांना अंतर्गत इजा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून ठाणे रेल्वे पोलिसांनी मद्यपी इसमावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर इसमाचे नाव भालेंद्र दिवेदी (४२) असे असून तो कोपरखैरणे येथे राहण्यास असल्याचे समजले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.