- प्रतिनिधी
विशेष बंदोबस्त शाखेतील (SPU) पोलीस हवालदाराच्या २१ वर्षीय मुलाने वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी प्रभादेवी म्हाडा कॉलनी येथे घडली. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील हे मुंबईतील विशेष बंदोबस्त शाखा (स्पेशल प्रोटेक्शन युनिट) येथे कार्यरत असून त्यांची ड्युटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नेते प्रफ्फुल पटेल यांच्या कडे होती. (Suicide)
हर्ष संतोष म्हस्के (२१) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. हर्ष हा आई-वडील यांच्यासह प्रभादेवी येथील म्हाडा कॉलनी बिल्डिंग क्रमांक १/सी मध्ये २२ व्या मजल्यावर राहण्यास होता. हर्ष हा शिक्षण घेत होता, वडील मुंबई पोलीस दलात हवालदार या पदावर असून विशेष बंदोबस्त शाखा येथे कार्यरत आहे. सद्या त्यांची ड्युटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नेते प्रफ्फुल पटेल यांच्या कडे होती. गुरुवारी त्यांना काही कामानिमित्त गावी जायचे असल्यामुळे रात्री घरी आले व त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वर लॉक करून कपाटात ठेवून दिली होती. त्यानंतर ते गावी निघून गेले होती. (Suicide)
(हेही वाचा – Republic Day : कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार ध्वजावर पुष्पवृष्टी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष आणि त्याची आई घरातच होते. आई स्वयंपाक घरात असताना हर्षने कपाटातून वडिलांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन बाथरूममध्ये गेला. काही वेळाने बाथरूममधून गोळी झाडल्याचा आवाज झाल्याने आई धावत स्वयंपाक घरातून धावत आवाजाच्या दिशेने आली. हर्ष बाथरूममध्ये होता, तिने हर्षला आवाज दिला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे आईने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. या घटनेची माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळ गाठून बाथरूमचा दरवाजा तोडला असता हर्ष रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. व त्याच्या हातात वडिलांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर होते. पोलिसांनी तात्काळ हर्षला केईएम रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. (Suicide)
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेऊन घटनस्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना घटनास्थळी कुठेही सुसाईड नोट वैगरे काहीही मिळून आले नाही. पोलिसांनी या घटनेची माहिती गावी गेलेले पोलीस हवालदार संतोष म्हस्के यांना दिली असून ते तात्काळ मुंबईकडे रवाना झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. (Suicide)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community