आजारी असल्याचे खोटे सांगून कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रजेवर गेलेल्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आलेली असून या कारवाईमुळे खोटे कारण देऊन रजेवर गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. संजय यशवंत सावंत असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत हे रेल्वे पोलीस दलात पोलीस निरीक्षक या पदावर आहे. घाटकोपर मुख्यालय या ठिकाणी सावंत यांची नेमणूक होती.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सावंत यांनी १४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत १५ दिवसांच्या अर्जित रजेसाठी अर्ज केला होता. परंतु १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थी सुरू होत असल्याने, सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सर्व प्रकारच्या रजा (साप्ताहिक सुट्या वगळता) निषिद्ध असल्याचे रेल्वे पोलिसांना सूचित करणारा पूर्व आदेश जारी करण्यात आला होता. आदेश असतानाही सावंत यांनी रजेसाठी अर्ज केल्याने वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर देखील १४ सप्टेंबर रोजी सावंत कामावर आजारी असल्याचे सांगून ते रजेवर गेले.
मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांच्यावर संशय आल्याने विभागाने त्यांच्याशी मोबाईल फोन वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो बंद होता. नंतर फोन सुरू झाला परंतु सावंत यांच्याकडून वरिष्ठांना प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांनी सावंत खरोखर आजारी आहेत का हे बघण्यासाठी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला त्याच्या ठाकुर्ली येथील निवासस्थानी पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी सावंत यांचा मुलगा घरी होता व त्याने वडील गणपती साठी गावी कणकवली येथे गेले असल्याचे हवालदार यांना सांगितले. सावंत यांनी खोटे कारण देऊन रजेवर गेल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त यांच्या स्वाक्षरी केलेला आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन सावंत यांनी केल्याचे समोर आले.
(हेही वाचा – ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी)
पोलीस आयुक्त यांच्याकडून पोलीस निरीक्षक संजय सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जारी केले. आदेशात असे म्हटले आहे की, “तुमचे वर्तन कर्तव्यात कसूर करत असल्याने, मी डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस आयुक्त लोहमार्ग, मुंबई, यांनी मला पोलिस कायदा, १९५१ च्या नियम २५, मुंबई पोलिस (शिक्षा) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत आहे आणि अपील १९५१ च्या नियम ०३ (१-अ) (अ) अंतर्गत नियम, हा आदेश जारी केल्याच्या तारखेपासून त्यांना (सावंत) सेवेतून निलंबित करण्याचा आदेश जारी करा. सावंत यांना दक्षिणेतील वाडीबंदर भागातील लोहमार्ग नियंत्रण कक्षात तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “निलंबनाच्या आदेशात नमूद केल्यानुसार त्याने नियंत्रण कक्षात अद्याप अहवाल दिलेला नाही, परंतु सविस्तर चौकशी केली जाईल ज्यामध्ये त्याच्यावर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community