गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा (Lawrence Bishnoi) लंडन मध्ये असणारा भाऊ अनमोल बिष्णोई वर ‘एनआयए’या केंद्रीय तपास संस्थेने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.अनमोल हा लंडन मध्ये बसून लॉरेन्स बिष्णोई टोळीचा धुरा सांभाळत असून त्याच्यावर एनआयए कडे दोन गुन्हे दाखल असून मुंबईत सलमान खान (Salman Khan) गोळीबार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
(हेही वाचा- Amit Thackeray: अमित ठाकरेंनी उद्धव काकांना सुनावलं; म्हणाले, “ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं होतं…”)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी करण्यात आलेल्या गोळीबाराची जवाबदारी स्वतः अनमोल बिष्णोई (Anmol Bishnoi) याने घेतली होती, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनमोल बिष्णोई याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते.तसेच २०२२ मध्ये राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने नोंदविलेल्या दोन गुन्ह्यात आरोपी असून एनआयए या दोन्ही गुन्हयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून अनमोल बिष्णोईला फरार घोषित करण्यात आले आहे. (Lawrence Bishnoi)
बाबा सिद्दीकीच्या (Baba Siddiqui) हत्येचा लॉरेन्स बिश्नोईशी संबंध जोडणाऱ्या सर्वात मजबूत साखळी पोलिसांनी उघड केले आहे की, बाबा सिद्दीकीच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन हल्लेखोरांपैकी एक जण लॉरेन्स बिष्णोईचा चुलत भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी इन्स्टंट मेसेजिंग ॲपद्वारे संपर्कात होता, तसेच त्याने हल्लेखोराला सिद्दीकीचे आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकीचे छायाचित्रे या ॲपच्या माध्यमातून पाठवल्याचा संशय आहे.बाबा सिद्दीकीच्या हत्येत अनमोल बिष्णोईचा थेट संबंध आला नसला तरी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत अनमोलचे नाव येत असले तरी पोलिसांनी अद्याप अनमोल बिष्णोईला अधिकृत आरोपी बनविण्यात आलेले नाही. (Lawrence Bishnoi)
(हेही वाचा- Ind vs NZ, 2nd Test : न्यूझीलंडच्या गहुंजे स्टेडिअमवर १०० मिली पाण्यासाठी मोजावे लागत होते ८० रुपये )
अनमोल बिष्णोई हा लंडन मधून लॉरेन्स बिष्णोई याची टोळी चालवत असून तो एनआयए च्या दोन गुन्ह्यात फरार असून तो तपास यंत्रणेला मिळून येत नसल्यामुळे अखेर एनआयए ने अनमोल बिष्णोई वर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. (Lawrence Bishnoi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community