२० वर्षीय प्रवासी तरुणीवर रिक्षाचालकाकडून आरेच्या जंगलात अत्याचार

243
२० वर्षीय प्रवासी तरुणीवर रिक्षाचालकाकडून आरेच्या जंगलात अत्याचार
२० वर्षीय प्रवासी तरुणीवर रिक्षाचालकाकडून आरेच्या जंगलात अत्याचार

मुंबईतील एका रिक्षा चालकाने २० वर्षीय महिला प्रवासीवर आरे कॉलनीच्या जंगलात लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरे पोलिसानी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रिक्षा, टॅक्सीतून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

इंद्रजित सिंह (२४) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील हा रिक्षा चालक मुंबईतील पश्चिम उपनगरात राहण्यास आहे. १७ मे रोजी २० वर्षाची पीडित महिला प्रवासी गोरेगाव येथून इंद्रजित सिंह याच्या रिक्षाने घरी जाण्यास निघाली होती. आरे कॉलनीतून रिक्षाने जात असताना इंद्रजित सिंह याने निर्जन ठिकाण बघून रिक्षा थांबवली, व पीडित तरुणीला बळजबरीने जंगलाच्या दिशेने घेऊन गेला, त्या ठिकाणी तीचा गळा आवळून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर रिक्षा चालक इंद्रजित याने या तरुणीला याबाबत कुठे वाच्छता केली तर जीवे ठार मारू अशी धमकी देऊन तेथून पळ काढला.

(हेही वाचा – Heavy Rain : हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

रिक्षा चालकाच्या धमकीमुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने त्याच अवस्थेत घर गाठले, तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे नैराश्यात गेलेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग कुटुंबांना सांगितला. ६ जुलै रोजी कुटुंबीयांनी आरे पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पीडित तरुणीकडे झालेल्या प्रसंगाबाबत चौकशी करून रिक्षा चालकाचा शोध घेऊन रविवारी रात्री पश्चिम उपनगरातुन रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.