शाळेतील फळ्यावर “जय श्री राम” (Student Beaten For Writing Jai Shri Ram)असं लिहिल्याने सरकारी शाळेच्या शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांनी मारहाण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अशी घटना जम्मू काश्मीर मध्ये घडली आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.अनेकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशा मध्येही असा प्रकार घडला होता. या प्रकरणाची अजून तपासणी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे वडील कुलदीप सिंग यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की शिक्षक फारुक अब्दुल्ला आणि प्निन्सिपल मोहद हाफीज यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याने वर्गात ब्लॅक बोर्डवर “जय श्री राम” लिहिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा :Ganeshotsav Special ST : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार ? एसटीचे नियोजन जाणून घ्या…)
एफआयआरमध्ये (FIR) असे म्हटले आहे की, मुलाने बोर्डवर जय श्री राम लिहिले होते. शिक्षाक फारुख यांनी वर्गात येऊन हा प्रकार पाहिल्यानंतर इतर विद्यार्थ्यांसमोर मुलाला वर्गाबाहेर नेले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले आणि दोघांनी खोलीला कुलूप लावून मुलाला बेदम मारहाण केली. जर त्याने पुन्हा असे कृत्य केले तर ते त्याला ठार मारतील, असे सांगितले. या मारहाणीमुळे मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community