Drugs : मुंबईत भिकाऱ्यामार्फत ड्रग्जची विक्री

रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकारी महिलेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची पाकिटे मिळून आल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली असून मुंबई तसेच उपनगरातील भिकारी मुंबई पोलीस तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाच्या रडारवर आले आहे.

583
CRIME: बंगळुरमध्ये २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त, ३ परदेशी नागरिकांसह ८ ड्रग्ज तस्करांना अटक

बोरिवली पश्चिम गोराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भिकारी महिला (Ganja) या अमली पदार्थांची (Drugs) विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर पोलिसांनी तत्काळ या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याजवळील गांजाची (Ganja) पाकिटे जप्त केली आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकारी महिलेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची (Ganja) पाकिटे मिळून आल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली असून मुंबई तसेच उपनगरातील भिकारी मुंबई पोलीस तसेच अमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाच्या रडारवर आले आहे. (Drugs)

मुंबईतील बोरिवली पश्चिम गोराई या परिसरात एका मुख्य रस्त्याच्या कडेला एक वृद्ध भिकारी महिला अंगावर ब्लॅकेट टाकून बसलेली आहे, व तिच्या अवती भोवती सतत तरुणांचा वावर आहे, हे तरुण लपून छपून या महिलेला पैसे देऊन तिच्याकडून एक पाकीट घेऊन निघून जात असल्याचे तेथील काही दुकानदारांच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान स्थानिक समाजसेवकाच्या मदतीने या महिलेचा व्हिडीओ काढून तीचे बिंग फोडले, या व्हिडीओमध्ये तिच्याजवळ मोठ्या प्रमाणात गांजा (Ganja) या अमली पदार्थने (Drugs) भरलेले पाकिटे दिसून येत आहे. तसेच ती कबूल देखील करीत आहे की, ती तरुणांना गांजा (Ganja) विकते, म्हणून स्थानिक समाजसेवक तिला जाब विचारत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोराई पोलिसांनी (Gorai Police) व्हायरल व्हिडीओच्या आधारे या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या विरुद्ध अमली पदार्थ (Drugs) प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drugs)

(हेही वाचा – PM Vishwakarma Scheme : कारागीरांच्या कौशल्य विकासासाठी असलेल्या विश्वकर्मा योजनेचा फायदा कसा मिळवाल?)

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या रडारवर मुंबईतील भिकारी

या व्हायरल व्हिडीओने मुंबईत खळबळ उडवून दिली असून शहरात आणि उपनगरात भिकाऱ्याच्या वेशात किती जण अमली पदार्थांचा (Drugs) बेकायदेशीर धंदा करीत असावे असे प्रश्न निर्माण होत आहे. या व्हिडीओमुळे मुंबईत अशा प्रकारे ड्रग्सची खुलेआम विक्री होऊ शकते हे उघड झाल्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहे. मुंबई पोलीस तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाच्या रडारवर मुंबईतील भिकारी आले आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मुंबईतील भिकाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या महिलेकडे मिळून आलेले ड्रग्ज (Drugs) हा तिच्याकडे विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, व त्याची विक्री करणारी टोळी येथे कार्यरत असून या टोळीचा शोध घेण्यात येत आहे. (Drugs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.