Ayodhya Ram Mandir बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला भागलपूरमधून पोलिसांनी पकडले

117
Ayodhya Ram Mandir बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला भागलपूरमधून पोलिसांनी पकडले
Ayodhya Ram Mandir बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला भागलपूरमधून पोलिसांनी पकडले

राम मंदिर (Ram Mandir) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अयोध्या पोलिसांनी भागलपूर (Bhagalpur Police) येथून अटक केली आहे. या आरोपीने  सोशल मीडियावर राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बॉम्बची धमकी देण्यात आली होती. (Ayodhya Ram Mandir)

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच अटक करण्यात आलेल्या तरुणाची गुप्तचर यंत्रणा चौकशी करत आहे. मयत हाजी जोहर अन्सारी यांचा मुलगा मोहम्मद मकसूद अन्सारी याला बिहारमधील भागलपूर येथील खंजरपूर येथील मस्जिद गल्ली येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने मोबाईलवरून संपर्क साधलेल्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी (Ayodhya Ram Temple Bomb Threat) मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर असून रविवारी पोलिसांनी बिहारच्या भागलपूर येथून आरोपीला अटक केली आहे.  (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक; CM Eknath Shinde यांनी दिले संकेत )

राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक​​​  

मोहम्मद मकसूदवर राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी आणि सीएम योगींना (CM Yogi Adityanath) जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही धमकी त्याने 14 जून 2024 रोजी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, रविवारी मकसूद आपल्या बहिणीच्या सासरहून घरी येत असताना पोलिसांनी आरोपीला पकडले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर ट्रेस करून त्याला भागलपूर येथील हुरहट्टा चौकातून पकडले.  (Ayodhya Ram Mandir)

राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून अयोध्येला नेले. यानंतर आरोपीच्या आईचे म्हणणे आहे की, आपला मुलगा गुन्हेगार नाही, तो निर्दोष आहे आणि पोलिसांनी त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. (Ayodhya Ram Mandir)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.