भारताच्या प्रयत्नांना यश; २६/११च्या हल्ल्यात सामील असलेला अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

95

हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला (Abdul Rehman Makki)  आंतरराष्ट्रीय दहशतवादी (Global Terrorist) म्हणून घोषित केले आहे. गेल्या वर्षी भारताने अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळेला चीनने नकाधिकाराचा वापर करत भारताच्या मागणीवर आक्षेप घेतला होता. मात्र चीनची आक्षेप धुडकावत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीने (UNSC) मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

पाकिस्तानात लपून बसलेल्या अब्दुल रहमान मक्कीला सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. सुरक्षा परिषदेच्या समितीने आयएसआयएल, अल-कायदा आणि संबंधित व्यक्ती, गट, संस्थांशी संबंधित १२६७ (१९९९), १९८९ (२०११) आणि २२५३ (२०१५)च्या अधीन राहून मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी यादीत नमूद केले आहे. संयुक्त राष्ट्राने निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव २६१० (२०२१)च्या परिच्छेद १मध्ये मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रास्त्र निर्बंध नमूद केले आहेत. अल-कायदा अंतर्गत बंदी घातलेल्या यादी व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्राच्या सातव्या अध्याय अंतर्गत बंदी घातली आहे.

दरम्यान भारत आणि अमेरिकापूर्वी अब्दुल रहमान मक्कीला आपल्याच देशातील कायद्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. भारतातील झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये मक्कीचा हात होता. ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी उभारणे, तरुणांची भरती करणे आणि हिंसाचारासाठी कट्टरपंथी बनवणे. तसेच महत्त्वाचे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ल्यांची योजना करण्यात समाविष्ट करणे, अशा प्रकारचे मक्की काम करत होता. अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि २६/११चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेहुणा आहे.

(हेही वाचा – देशात घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, २६ जानेवारी, जी-२० परिषद दहशतवाद्यांचे लक्ष्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.