फरार आरोपी Satish Bhosale ला प्रयागराजमध्ये अटक

76

ढाकणे पितापुत्राला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला आरोपी सतीश भोसले (Satish Bhosale) याला उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराजमधून (Prayagraj) अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले याने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याच्या घरी गांजा हा अमली पदार्थही आढळून आला होता. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ही अटक केली आहे. काही दिवसांपासून फरार असलेला सतीश भोसले अटकेत आहे. बीडचे (Beed) पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Bangladesh Unrest : शेख हसीनांसह कुटुंबियांची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश)

सतीश भोसले याने एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ करून समाजमाध्यमांत दहशत निर्माण करण्यासाठी व्हायरल केला होता. आता पोलिसांनी सतीश भोसले याला अटक केली आहे. पोलिसांनी दोन पथके नेमून देखील त्याला अटक झाली नव्हती. सध्या तो प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केली होती, त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गांजा घरी सापडल्यानंतर त्याचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोक्या गेल्या दोन आठवड्यांपासून बीडमध्ये फिरत होता; पण पोलिसांना तो सापडला नव्हता. प्रयागराज पोलीस सतीश भोसले (Satish Bhosale) याला बीड (Beed) पोलिसांच्या स्वाधीन करतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.