एका क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबईतील टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB)
चेंबूर परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराने एका महिलेच्या सांगण्यावरून त्याच्या क्रेडीड सोसायटीमध्ये दामदुप्पटच्या आमिषाला बळी पडून २७.५० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. कालावधी उलटून गेल्यानंतर ही महिला पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली होती. दरम्यान गुंतवणूकदार महिलेने कसेबसे १० लाख रुपये या महिलेकडून मिळवले, उर्वरीत १७.५० लाख रुपयांची रक्कम देण्यास महिला टाळाटाळ करू लागली. (ACB)
(हेही वाचा – Worli Hit And Run प्रकरणी अखेर मिहीर शाहला अटक; 12 जणही पोलिसांच्या ताब्यात)
गुंतवणूकदार महिला ही क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात गेली, तिने पैसे परत केव्हा मिळेल म्हणून विचारणा केली. असता क्रेडिट सोसायटीतील महिलेने टिळक नगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदार महिलेविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. टिळक नगर पोलिसांनी गुंतवणूकदार महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोर उभे केले, असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल यांनी गुंतवणूक केलेली रक्कम या महिलेकडून काढून देतो, मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली. गुंतवणूकदार महिलेने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. (ACB)
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केला असता पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (ACB)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community