-
प्रतिनिधी
पेडर रोड येथे राहणाऱ्या ८५ वर्षीय व्यावसायिकाचा प्रभादेवी येथे मोटारसायकलच्या धडकेत झालेला मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादर पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी मोटारसायकलस्वार विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या अपघाताची दुसरी बाजू देखील तपासली जात असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. (Accident)
बलराज परमानंद मेहरा (८५) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. बलराज मेहरा हे दक्षिण मुंबईतील सर्वात उच्चभ्रू समजला जाणारा पेडर रोड वरील कंबाला हिल येथील २० सी आशा महल येथे मुलीची मुलगी (नात) सोबत वास्तव्यास होते. मेहरा यांची मुलगी अनिता संजय शर्मा (६७) यांचा मुंबईतील फोर्ट येथे पतीसोबत राहत होत्या. २००५ पासून त्या पतीसोबत अमेरिका येते स्थायिक झालेल्या आहेत. (Accident)
(हेही वाचा – ‘ट्रेड सर्टिफिकेट’ न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांचे आदेश)
वडील आणि मुलीला भेटण्यासाठी वर्मा दाम्पत्य मुंबईत अधूनमधून येत असतात. बलराज मेहरा यांची वरळी येथील २५० सी-हिंद सायकल रोड, नीलम सेंटर समोर मेहरा हाऊस नावाची संपत्ती आहे. मेहरा हाऊस या ठिकाणी काम सुरू असल्या मुळे बलराज मेहरा हे येथील काम बघण्यासाठी पेडर रोड येथून वरळीला ये-जा करीत असतात. या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून किसन पोदार हे असतात. तर मेहरा यांची सेक्रेटरी म्हणून एका महिलेला ठेवण्यात आलेली असून हे दोघे मेहरा हाऊस येथे काम करतात. (Accident)
बलराज मेहरा यांची मुलगी पतीसह अमेरिकेतून मुंबईत फेब्रुवारी मध्ये आली होती आणि ती पतीसह महाराष्ट्रातील देवदर्शन करून सीबीडी बेलापूर येथे थांबले होते. १६ मार्च रोजी, मेहराच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारे मनीष बरक-हाडा यांनी शर्मा यांना कळवले की, तिच्या वडिलांना वरळीतील बाबासाहेब वरळीकर चौकातील थापर हाऊसजवळ एका दुचाकीने धडक दिली. मेहरा यांची सेक्रेटरी ज्योती कुडाळकर यांच्या म्हणण्यानुसार, अपघात पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने मेहराच्या फोनवरून तिला फोन करून घटनेची माहिती दिली. ती सुरक्षा रक्षक किशन पोद्दार यांच्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना बस स्टॉपवर मेहरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात आणण्यात आले. (Accident)
(हेही वाचा – शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार; मंत्री Sanjay Shirsat यांचे निर्देश)
अपघाताची माहिती मिळताचमुलगी अनिता शर्मा रुग्णालयात दाखल झाल्या, जिथे तिला तिच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.दादर पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांसह भारत-अतिय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि २८१ (अविचारीपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे) अंतर्गत चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अपघात आणि मेहराच्या मालमत्तेसंदर्भात सुरू असलेल्या वादाशी अपघाताचा काही संबंध आहे का याबाबत देखील चौकशी करत आहेत. (Accident)
मेहरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात संरक्षण मागितले होते. त्यांनी न्यायालयात असा आरोप केला बांधकाम विकासाने गुंडांना कामावर ठेवले होते. त्यांच्या कार्यालयात घुसले होते आणि मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आले आहे आणि तपासकर्ते आता त्याची सध्याची स्थिती तपासत आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अपघाताचे ठिकाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये समाविष्ट नाही, त्यामुळे संबंधित वाहनाची ओळख पटवणे आव्हानात्मक बनत आहे. तथापि, संशयिताचा शोध घेण्यासाठी ते परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. “सध्या सुरू असलेल्या कायदेशीर वादामुळे झालेल्या गैरप्रकाराची शक्यता यासह आम्ही सर्व बाजूंनी गांभीर्याने विचार करत आहोत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, परंतु आम्ही सक्रियपणे सुगावा शोधत आहोत,” असे दादर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. (Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community