Accident : वाहतूक पोलिसांवर कार चढवली, जखमी पोलीस रुग्णालयात दाखल 

111
Accident : वाहतूक पोलिसांवर कार चढवली, जखमी पोलीस रुग्णालयात दाखल 
Accident : वाहतूक पोलिसांवर कार चढवली, जखमी पोलीस रुग्णालयात दाखल 
चुकीचे वळण घेणाऱ्याला कार चालकाला थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदारावर कार चालकाने कार चढवली (Accident) त्यात पोलीस हवालदार गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
ही घटना कुर्ला पश्चिम एलबीएस रोडवर घडली, या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी कार चालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मण मोजर (४९) असे जखमी पोलीस हवालदारचे नाव आहे.

(हेही वाचा-Mumbai weather: मुंबईत पसरली धुक्याची चादर; थंडीची चाहूल, वातवरणात गारवा)

लक्ष्मण मोजर हे वाहतूक विभागाच्या कुर्ला विभागात कार्यरत आहे.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार लक्ष्मण मोझर हे कुर्ला वाहतूक चौकीच्या सिग्नलवर कर्त्यव्यावर असताना एका वॅगनआर कारच्या चालकाने सिग्नल जवळ चुकीचा वळण घेण्याचा प्रयत्न केला, असता पोलीस हवालदार मोझरने त्याला चुकीचे वळण घेण्यास अडवले, व त्याला वळण घेण्यास मनाई करून देखील कार चालकाने बळजबरीने वळण (यु टर्न) घेतला, दरम्यान मोजर हे त्याच्या कारच्या समोर (Accident) आले व त्यांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने कार न थांबवता थेट हवालदार मोजर यांच्या अंगावर चढवून त्यांना जखमी करून कार सह तेथून धूम ठोकली. या घटनेत गंभीर जखमी झालेले मोजर यांना सहकाऱ्यांनी तात्काळ फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोजर यांचा एका पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी कार चालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि निष्काळजी पणे वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतला असून कार चालक हा कुर्ला येथे राहणारा असून या घटनेनंतर मात्र तो फरार झाला असल्याची माहिती वपोनि. अशोक खोत यांनी दिली.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=0_ctu_EWhMQ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.