Accident : कोस्टल रोडवर पहिला अपघात; बीएमडब्ल्यूने उडवले कामगाराला

49
Accident : कोस्टल रोडवर पहिला अपघात; बीएमडब्ल्यूने उडवले कामगाराला
  • प्रतिनिधी

गणेश विसर्जनाच्या दिवशी सुरू करण्यात आलेला कोस्टल रोडवर पहिल्याच दिवशी बीएमडब्ल्यू या मोटारीने एका कामगाराला धडक दिली, या अपघातात (Accident) कामगाराचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी बीएमडब्ल्यूच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. बीएमडब्ल्यू चालक हा हिरे व्यावसायिक आहे.

काश्मीर मिसा सिंग असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी कोस्टल रोड तात्पुरता सुरू करण्यात आला होता, मात्र कोस्टल रोडचे किरकोळ काम सुरू होते. त्या ठिकाणी फोरमन, वेल्डर, वायरमन आणि मेकॅनिकल हे कामगार काम करीत होते. मृत काश्मीर मिसा सिंग हा कामगार उत्तरेकडील लेनवर उभा होता आणि कोस्टल रोड गेट क्रमांक २, वरळी डेअरीजवळ, दक्षिणेकडील लेनजवळ त्याने रस्ता ओलांडण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू मोटारीने त्याला धडक दिली, असे त्याच्यासोबत काम करणारा कामगार पिंटू कुमार ठाकूर यांनी सांगितले. (Accident)

(हेही वाचा – Ajit Pawar 10 टक्के मुस्लिम उमेदवार देणार?)

आम्ही पूजेची तयारी करत असताना आम्हाला मोठा आवाज झाला, आम्ही सर्वजण तआवाजाच्या दिशेने धाव घेतली असता आमच्यापैकी एक कामगार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आम्ही ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना भाटिया रुग्णालयात नेले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले अशी माहिती कामागाराने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, बीएमडब्ल्यू मलबार हिल मधील बेन हर अपार्टमेंटमध्ये राहणारा ४५ वर्षीय राहिल हिमांशू मेहता चालवत होता, राहिल हिमांशू मेहता हा मित्राला भेटून घरी जात असताना अपघात झाला. (Accident)

मेहता हे हिरे व्यापारी आहेत आणि दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊसमध्ये वडिलांसोबत ज्वेलरी डिझायनिंग फर्म चालवतात. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३, मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम १८४ धोकादायक ड्रायव्हिंगच्या कलम १०६ (१) नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि २८१ रॅश ड्रायव्हिंग किंवा सार्वजनिक मार्गावर चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकारी म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, मेहता यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे, त्यांनी त्याचे रक्ताचे नमुने देखील घेतले आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि प्रथमदर्शनी असे आढळून आले की तो दारू पिलेला नव्हता. (Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.