Accident : पूर्व मुक्त महामार्गावर मासे विक्रेत्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोन ठार, चार जखमी

71
Accident : पूर्व मुक्त महामार्गावर मासे विक्रेत्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोन ठार, चार जखमी
  • प्रतिनिधी 

पूर्व मुक्त महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सर जे. जे. रुग्णालय दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी चालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत आणि जखमी हे मासे विक्रेते असून कळवा येथून भाऊचा धक्का येथे मासे खरेदीसाठी जात असताना हा अपघात झाला.

(हेही वाचा – IPL 2025, CSK vs LSG : धोनीचे आयपीएलमध्ये यष्टीमागे २०० बळी)

विनोद रामा वायडे (५२), अनिता रामजी जयस्वार (६०) अशी अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे असून खुशबू राजभर, गीता रामनयन राजभर, सुलेखा विनोद वायडे आणि चालक चेतन नंदू पाटील हे चौघे जण जखमी असून त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी आणि मृत हे कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारे असून मासे विक्रते आहेत. मंगळवारी पहाटे मृत आणि जखमी हे इको या वाहनाने मासे खरेदी करण्यासाठी भाऊचा धक्का येथे निघाले होते. (Accident)

(हेही वाचा – नॅशनल हेराल्डप्रकरणी आरोपपत्रात सोनिया आणि Rahul Gandhi यांचे नाव)

पूर्व मुक्त द्रुतगती महामार्गावरून चालक चेतन पाटील हा वाहन भरधाव वेगाने चालवत असताना त्याला वाहन सावकाश चालविण्यास सांगून त्याने दुर्लक्ष केले. भरधाव वेगात असतांना पूर्व मुक्त महामार्ग ऑरेंज गेट जवळ चालक चेतन पाटील याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर धडकुन अपघात झाला. या अपघाताची (Accident) माहिती शिवडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ जेजे रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी विनोद रामा वायडे (५२) अनिता रामजी जयस्वार (६०) यांना मृत घोषित केले असून जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी चालक चेतन पाटील विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.